भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला २- १ ने पराभूत केले होते. या मालिकेत भारतीय संघातील युवा खेळाडूंनी महत्वाची भूमिका बजावली होती. याच कामगिरीवर आनंदीत होऊन आनंद महिंद्रा यांनी युवा खेळाडूंना ‘थार एसयूव्ही’ देण्याचे ठरवले होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खेळाडूंना ही गाडी मिळण्यास सुरुवात झाली आहे. शार्दुल आणि नटराजननंतर आता मोहम्मद सिराजला देखील ही गाडी भेट मिळाली आहे.
आनंद महिंद्रा यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना भेट देण्याचे ठरवले होते. यात शुबमन गिल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश होता. रविवारी ही गाडी भेट मिळाल्यानंतर मोहम्मद सिराजने सोशल मीडियावर फोटो शेअर करत आनंद महिंद्रा यांचे आभार मानले आहेत.
मोहम्मद सिराज सध्या आयपीएल स्पर्धेच्या सरावात व्यस्त आहे. त्यामुळे ही भेट स्वीकारण्यासाठी उपलब्ध नव्हता. सिराजचा मोठा भाऊ आणि आईने ही भेट स्वीकारली आहे. सिराजने एक फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याची आई आणि त्याचा मोठा भाऊ दिसून येत आहे.
ज्यावर सिराजने कॅप्शन म्हणून लिहिले आहे की, “माझ्याकडे यावेळेस शब्द नाहीत. ही सुंदर महिंद्रा थार गाडी मिळण्याचा मला खूप आनंद होत आहे. यावेळी, मी आनंद महिंद्रा सरांचे आभार मानतो. दुर्देवाने,मी तिथे उपस्थित नाही. माझ्या ऐवजी माझा मोठा भाऊ आणि माझी आई ही भेट भेट स्वीकारत आहे.”
https://www.instagram.com/p/CNPJgmVjvXM/
मोहम्मद सिराज पूर्वी शार्दुल ठाकूर आणि टी नटराजन यांना देखील ही भेट मिळाली आहे. टी नटराजनला भेट मिळाल्यानंतर त्याने फोटो शेअर करत लिहिले होते की, “भारतासाठी क्रिकेट खेळणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट होती. इथपर्यंत पोहोचणे माझ्यासाठी सोपे नव्हते. ज्याप्रकारे मला लोकांचे प्रेम मिळाले आहे. त्याने मी भारावून गेलो आहे.”
यानंतर रिटर्न गिफ्ट म्हणून नटराजनने आनंद महिंद्रा यांना पहिल्या कसोटी सामन्यात परिधान केलेली जर्सी स्वाक्षरी करून दिली होती.
Playing cricket for India is the biggest privilege of my life. My #Rise has been on an unusual path. Along the way, the love and affection, I have received has overwhelmed me. The support and encouragement from wonderful people, helps me find ways to #ExploreTheImpossible ..1/2 pic.twitter.com/FvuPKljjtu
— Natarajan (@Natarajan_91) April 1, 2021
तसेच शार्दुल ठाकूरने देखील ही गाडी भेट मिळाल्यानंतर आनंद महिंद्रा यांचे आभार मानले होते. त्याने लिहिले होते की, “नवीन महिंद्र थार आली आहे. महिंद्रा कंपनीने हे जबरदस्त प्रकारे बनवले आहे. मला ही एसयूव्ही चालविण्यात खूप आनंद झाला आहे. ऑस्ट्रेलिया दौर्यावरील आमच्या योगदानाचे कौतुक करणारे श्री आनंद महिंद्रा जी आणि प्रकाश वाळणकर जी यांचे मी पुन्हा एकदा आभार मानू इच्छितो.”
New Mahindra Thar has arrived!! @MahindraRise has built an absolute beast & I’m so happy to drive this SUV. A gesture that youth of our nation will look upto. Thank you once again Shri @anandmahindra ji, @pakwakankar ji for recognising our contribution on the tour of Australia. pic.twitter.com/eb69iLrjYb
— Shardul Thakur (@imShard) April 1, 2021
मोहम्मद सिराजची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेतील कामगिरी –
सिराजने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून कसोटी पदार्पण केले होते. त्याने मेलबर्न येथे पदार्पणाच्या कसोटी सामन्यात सर्वांना प्रभावित करताना पहिल्या डावात २ आणि दुसऱ्या डावात ३ अशा मिळून एकूण ५ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच त्या पुढील सामन्यात सिडनी येथे त्याने २ विकेट्स घेतल्या. तसेच ब्रिस्बेन कसोटीत त्याने पहिल्या डावात १ आणि दुसऱ्या डावात ५ अशा मिळून ६ विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याने या पदार्पणाच्या कसोटी मालिकेत ३ सामन्यात १३ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमध्ये खेळलेले ५ वयस्कर खेळाडू; एक आहे तब्बल ४५ वर्षांचा
तब्बल सात वर्षांपुर्वी केलेला ट्विट आज धोनीला पडतोय महागात, सोशल मीडियावर चाहते विचारतायत…
आयपीएलच्या पहिल्याच हंगामातील सर्व कर्णधार सध्या करतायंत तरी काय, वाचा थोडक्यात