भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बुधवारी (दि. 18 जानेवारी) हैदराबाद येथे खेळण्यात आला. अत्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 12 धावांनी विजय मिळवला. सध्या शानदार फॉर्म मध्ये असलेला व आपल्या घरच्या मैदानावर पहिलाच सामना खेळत असलेल्या वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने सामना जिंकून देणारी गोलंदाजी केली.
जसप्रीत बुमराह याच्या अनुपस्थितीत सिराज वनडे क्रिकेटमध्ये भारताचा पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज बनला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही त्याने त्याची प्रचिती सर्वांना दिली. 350 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडला त्याने कॉनवेच्या रूपाने पहिला धक्का दिला. त्यानंतर त्याने जम बसवत असलेला न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम याला तंबूचा रस्ता दाखवला. न्यूझीलंडला सामन्यात पुनरागमन करून दिलेल्या मिचेल सॅंटनर व मायकेल ब्रेसवेल या जोडीला फोडण्याचे काम देखील त्यानेच केले. 46 व्या षटकात गोलंदाजीला आल्यावर त्याने या जोडीची 163 धावांची भागीदारी संपवली. सॅंटनरला 57 धावांवर बाद केल्यानंतर त्याने पुढच्याच चेंडूवर हेन्री शिप्लीला त्रिफळाचीत करत भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले. त्याने आपल्या 10 षटकात 46 धावा देत 4 बळी टिपले.
The @mdsirajofficial effect! 🔥🔥
Middle stump out of the ground 👌
Live – https://t.co/IQq47h2W47 #INDvNZ @mastercardindia pic.twitter.com/mxYajNShmC
— BCCI (@BCCI) January 18, 2023
नुकत्याच झालेल्या भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या वनडे मालिकेत सिराज याने आपल्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मालिकेतील पहिल्या सामन्यात दोन तर दुसऱ्या सामन्यात त्याने तीन बळी मिळवत भारताच्या विजयात योगदान दिले. तिरुअनंतपुरम येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात त्याने वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी करताना चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. अशाप्रकारे त्याने मालिकेत सर्वाधिक नऊ बळी नावे केले. याच कामगिरीचे बक्षीस म्हणून तो ताज्या वनडे गोलंदाजी क्रमवारीत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
(Mohammad Siraj Stand Out Performance On Home Ground At Hyderabad Against Newzealand)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिल्या वनडेत टीम इंडियाचा रोमांचक विजय! ब्रेसवेलची एकाकी झुंज अपयशी, सिराजची चालली जादू
हैदराबादमध्ये ब्रेसवेलचा ‘वन मॅन शो’! स्फोटक खेळीने तमाम क्रिकेटप्रेमींना केले खूश