भारत विरुद्ध इंग्लंडच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना आजपासून अहमदाबादच्या ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ वर सुरु झाला. या सामन्यात पाहुण्या इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र फलंदाजांना पहिल्या दिवशी अनुकूल असलेल्या खेळपट्टीचा इंग्लंडच्या संघाला फारसा फायदा उठवता आला नाही.
भारतीय संघाच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर इंग्लंडची पहिल्याच सत्रात ३ बाद ३० अशी अवस्था झाली होती. त्यावेळी सगळ्यांनाच इंग्लंडचा डाव पुन्हा एकदा कमी धावसंख्येवर आटोपणार, असे वाटले होते. मात्र त्यानंतर अनुभवी जॉनी बेअरिस्टो आणि बेन स्टोक्स यांनी भागीदारी करत इंग्लंडचा डाव सावरला. यावेळी बेअरिस्टो सेट झाला असून तो मोठी खेळी उभारेल, असे वाटत होते. मात्र मोहम्मद सिराजने त्यावर पाणी फेरले.
सिराजने बेअरिस्टोला केले पायचीत
पहिल्या दिवशी फलंदाजांना अनुकूल असलेल्या अहमदाबादच्या खेळपट्टीवर मोहम्मद सिराजने अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन केले. नवीन चेंडूवर तीनच षटकांचा स्पेल मिळालेल्या सिराजने त्यांनतर पुन्हा एकदा गोलंदाजीवर आधी इंग्लंडचा कर्णधार जो रूटची शिकार केली. खोल टप्प्याच्या चेंडूवर त्याने रूटला पायचीत पकडले.
त्यानंतर २९व्या षटकात त्याने सेट झालेल्या जॉनी बेअरिस्टोला एका अप्रतिम चेंडूवर बाद करत माघारी धाडले. आधी उजव्या यष्टीबाहेर चेंडू टाकून सिराजने बेअरिस्टोसाठी सापळा तयार केला. आणि त्यानंतर उजव्या यष्टीवरून आत येणारा चेंडू सिराजने टाकला. जो थेट बेअरिस्टोच्या पॅडवर जाऊन लागला. पायचीतचे अपील होताच पंचांनी देखील तो बाद असल्यचा निर्वाळा दिला. बेअरिस्टोने स्टोक्सची चर्चा करून डीआरएस घ्यायचा निर्णय घेतला. मात्र त्यातही तो बाद असल्याचे स्पष्ट झाले.
https://youtu.be/NwuhdA7V110
दरम्यान, बेअरिस्टो बाद झाल्यानंतरही इंग्लंडच्या कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करण्यात अपयश आले. बेन स्टोक्सने अर्धशतक झळकावले. मात्र तोही त्यांनतर लगेच बाद झाला. इतर इंग्लिश फलंदाजही नियमित अंतराने बाद होत गेल्याने इंग्लंडचा डाव २०५ धावांवर कोसळला.
महत्वाच्या बातम्या:
ब्रेकिंग! पाकिस्तान सुपर लीगला कोरोनाचा फटका; उर्वरित हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित
धोनीची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी केली तोबा गर्दी, पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज
व्हिडिओ: मोहम्मद सिराजची जबरा गोलंदाजी, चेंडू कळायच्या आधीच इंग्लिश कर्णधार पायचित