---Advertisement---

डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी ‘हा’ खेळाडू महत्वाचा, भारतीय दिग्गजाचा दावा

On: मंगळवार, डिसेंबर 27, 2022 12:53 AM
WTC Final India Team
---Advertisement---

नुकताच भारत आणि बांगलादेश या संघात कसोटी मालिका खेळवली गेली. या संघात खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशवर मात करत रोमहर्षक विजय मिळवला आणि मालिका 2-0ने जिंकत यजमान संघाला व्हाईटवॉश दिला. मीरपूर येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात श्रेयस अय्यर आणि आर अश्विन यांनी आठव्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिला. यावर भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ श्रेयस अय्यर याच्या खेळीवर प्रभावित झाल्याने त्याने यावर आपली प्रतिक्रिया दिली.

भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफ म्हणाला की आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात पोहचण्यासाठी मधल्या फळीत श्रेयस अय्यर हा महत्वाचा खेळाडू आहे. कैफ ट्वीट करत म्हणाला की, “भारताच्या डब्ल्यूटीसीच्या अपेक्षांसाठी श्रेयस अय्यर खूप महत्वाचा आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी फिरकीपटू फॉर्ममध्ये होते. अय्यरने खेळपट्टीवर टीकून राहण्याचे कौशल्य दाखवून भारताला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पुढच्या वर्षी भारतात होणाऱ्या मालिकेत अय्यर महत्वपूर्ण खेळाडू असेल.”

यावर्षी भारताचा श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. अय्यरने सातत्याने आणि शांतपणे धावा केल्या आणि विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्यासारख्या दिग्गजांना धावा करण्याच्या बाबतीत मागे पाडले. यावर्षी अय्यरने 48.75 च्या सरासरीने 1609 आंतरराष्ट्रीय धावा केल्या. यात त्याने 1 शतक आणि 14 अर्धशतक झळकावले. अय्यरने यावर्षी खेळलेल्या 5 कसोटी सामन्यात 60.28 च्या सरासरीने 422 धावा केल्या, ज्यात 4 अर्धशतकांचा समावेश आहे.

बागंलादेेशने दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी केली आणि पहिल्या डावात बांगलादेश संघ 227 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर भारताने आपल्या डावात पहिल्या डावात 314 धावा केल्या. यावेळी भारताकडे 87 धावांची आघाडी होती. बांगलादेश दुसऱ्या डावात 231 धावांवर सर्वबाद झाला आणि जिंकण्यासाठी 145 धावांचे आव्हान मिळाले, जे भारताने 7 गडी गमावत भारताने विजय मिळवला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हा अनुभव प्रत्येकाला मिळो! मुलींसोबत राष्ट्रगीत गातानाचा क्षण अभिमानास्पद, वॉर्नरने शेअर केला फोटो
“वर्ल्डकपसाठी तोच सलामीवीर हवा”, ऑसी दिग्गजाने टाकले युवा भारतीय फलंदाजाच्या पारड्यात वजन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---