अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोहम्मद नाबीला त्याच्या देशाच्या क्रिकेट बोर्डामध्ये सदस्याच्या रुपात सामाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नबी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (एसीबी) ४ बोर्ड सदस्यातील एक सदस्य बनला आहे. विशेष म्हणजे, खूप कमी सक्रिय खेळाडूंना त्यांच्या देशाच्या क्रिकेट बोर्डामध्ये सदस्यरुपी स्थान मिळते. आता नाबीचे नाव अशा निवडक खेळाडूंच्या यादीत सामील झाले आहे. Mohammed Nabi’s Name Included In ACB Members
नाबीने गतवर्षी सप्टेंबर महिन्यात बांग्लादेशविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळल्यानंतर कसोटीतून निवृत्ती जाहीर केली होती. तरीही तो अफगाणिस्तान वनडे आणि टी२० संघाचा सक्रिय खेळाडू आहे. त्याच्याव्यतिरिक्त अफगाणिस्तानच्या ४ बोर्ड सदस्यांमध्ये विद्यमान महिला व्यवहार मंत्री हसीना सफी, कंधारचे खासदार रोहुल्लाह खानजादा आणि अफगाणिस्तानच्या पहिल्या उपराष्ट्रपतींची ज्येष्ठ सल्लागार हारुन मीर यांचा समावेश आहे.
एसीबीने म्हटले की, “ज्या सदस्यांना बदलण्यात आले आहे, त्यामध्ये नगरविकास मंत्री मोहम्मद जवाद पिकर, माजी उप-उद्योगमंत्री आणि वाणिज्यमंत्री कामिला सिद्दीकी, वाहतूकमंत्री हमीद थमासी आणि इस्लामाबादचे माजी अफगाणिस्तान राजदूत शुकरुल्लाह अतिफ मशाल यांचा समावेश आहे.”
एसीबी बोर्डामध्ये एकूण ९ सदस्य असतात. सध्या सामाविष्ट झालेल्या नव्या सदस्यांव्यतिरिक्त इतर सदस्यांमध्ये बोर्डाचे अध्यक्ष फरहान यूसुफजई, संसदीय कामकाज राज्यमंत्री झिया-उल-हक अमरखिल, सिनेटचा सदस्य गुलालाई नूर सफी, माजी राष्ट्रपती फराइदून अल्हम यांच्या प्रशासकीय कार्यालयात सांस्कृतिक कार्य व व्यवसायातील उप-प्रमुख अब्दुल रहमान अलोकोजे यांचा समावेश आहे.
मोहम्मद नबीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मर्यादित षटकांच्या स्वरुपातील आकडेवारी उल्लेखनीय आहे. त्याने वनडेत १२४ सामने खेळत २७९६ धावा आणि १३० विकेट्स घेतल्या आहेत. तर, टी२० क्रिकेटमध्ये त्याने १३१७ धावा आणि ६९ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
शून्यावर बाद न होता आयपीएलच्या एका हंगामात तब्बल ८२५ धावा ठोकणारा धुरंदर फलंदाज
‘तुम्ही माझ्या सीटवर बसा, मी इकॉनॉमीमध्ये बसेल,’ धोनीचा दिलदारपणा; स्टाफ मेंबरला आपली सीट केली ऑफर
ट्रेंडिंग लेख –
निवृत्तीनंतर आता या ५ क्षेत्रात दिसू शकतो एमएस धोनी
लाईनीत उभं करत आपल्याच संघातील खेळाडूंची झाडाझडती घेणारा जंलटमन क्रिकेटर
एकाच दिवशी एकाच फलंदाजाने क्रिकेटमध्ये केली होती दोन शतकं