इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या महारणसंग्रामाला शुक्रवारपासून (दि. 31 मार्च) सुरुवात झाली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघ एकमेकांसमोर उभे ठाकलेले. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने आयपीएल 2023ची पहिली विकेट घेण्याचा मानही मिळवला आणि खास विक्रमही रचला.
या सामन्यात गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी चेन्नई सुपर किंग्स संघाकडून डेवॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड सलामीला उतरले होते. यावेळी चेन्नईला तिसऱ्याच षटकात झटका बसला. गुजरातकडून मोहम्मद शमी (Mohammed Shami) हा तिसरे षटक टाकत होता. यावेळी स्ट्राईकवर कॉनवे फलंदाजी करत होता. शमीने षटकातील दुसरा चेंडू टाकला असता, त्या चेंडूवर कॉनवे फटका मारू शकला नाही. त्यामुळे चेंडू थेट स्टंप्सला जाऊन लागला आणि कॉनवे 1 धावेवरच त्रिफळाचीत बाद झाला. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
A cracking delivery to get his 1⃣0⃣0⃣th IPL wicket 🔥🔥@MdShami11 picks the first wicket of #TATAIPL 2023!
Follow the match ▶️ https://t.co/61QLtsnj3J#GTvCSK pic.twitter.com/hN0qgJ2rFo
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2023
मोहम्मद शमीचे दोन विक्रम
यासह शमी आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेतील पहिली विकेट घेणारा गोलंदाज ठरला. विशेष म्हणजे, या विकेट्ससह शमीने खास आपल्या नावावर खास विक्रमही नोंदवला.
प्रत्येक आयपीएल हंगामामध्ये पहिली विकेट घेणारे गोलंदाज
2023 – मोहम्मद शमी*
2022 – उमेश यादव
2021 – काईल जेमीसन
2020 – पीयूष चावला
2019 – हरभजन सिंग
2018 – दीपक चाहर
2017 – अनिकेत चौधरी
2016 – इशांत शर्मा
2015 – मॉर्ने मॉर्केल
2014 – लसिथ मलिंगा
2013 – ब्रेट ली
2012 – जेम्स फ्रँकलिन
2011 – इकबाल अब्दुल्ला
2010 – चमिंडा वास
2009 – थिलान थुसारा
2008 – झहीर खान
शमीने कॉनवेच्या रूपात आयपीएल कारकीर्दीतील 100वी विकेट घेतली. अशी कामगिरी करणारा तो आठवा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला. आयपीएल कारकीर्दीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अव्वलस्थानी भुवनेश्वर कुमार आहे. त्याने 154 विकेट्स घेतल्या आहेत.
यानंतर दुसऱ्या स्थानी जसप्रीत बुमराह असून त्याने 145 विकेट्स घेतल्या आहेत. तिसऱ्या स्थानी असलेल्या उमेश यादवने 135, चौथ्या स्थानी असलेल्या संदीप शर्माने 114, पाचव्या स्थानी असलेल्या आशिष नेहराने 106, सहाव्या स्थानावरील विनय कुमारने 105 आणि सातव्या स्थानावरील झहीर खान याने 102 विकेट्स घेतल्या आहेत. (Mohammed Shami bold devon Conway as 100th wicket in IPL)
आयपीएल कारकीर्दीत 100हून अधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज
भुवनेश्वर कुमार- 154
जसप्रीत बुमराह – 145
उमेश यादव – 135
संदीप शर्मा – 114
आशिष नेहरा – 106
विनय कुमार – 105
झहीर खान – 102
मोहम्मद शमी- 100*
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL 2023 । कर्णधार रोहितवर जोफ्रा आर्चर पडतोय भारी, नेट्समध्ये करतोय कहर गोलंदाजी
वयाच्या 32व्या वर्षीय इंग्लंडचा दिग्गज करतोय आयपीएल पदार्पण, पण सोप्पा नसेल मार्ग; वाचा सविस्तर