---Advertisement---

क्लीन बोल्ड! शमीच्या अप्रतिम चेंडूने उडवला धोकादायक बटलरचा त्रिफळा, पाहा व्हिडिओ

On: मंगळवार, ऑक्टोबर 19, 2021 12:55 AM
---Advertisement---

टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे खेळला जात आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा थेट सुपर १२ फेरीत समावेश झालेला आहे. त्यामुळे भारत सुपर फेरीतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने २४ ऑक्टोबर रोजी या स्पर्धेतील आपल्या अभियानाची सुरुवात करेल. पण, तत्पूर्वी भारताने सोमवारी (१८ ऑक्टोबर) इंग्लंडविरुद्ध सराव सामना खेळला. या सामन्यात भारताने ७ विकेट्सने विजय मिळवला. भारताकडून गोलंदाजीत मोहम्मद शमीने चमकदार कामगिरी केली.

बटलर, लिव्हिंगस्टोनला केले त्रिफळाचीत
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे इंग्लंडचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. पण, चौथ्याच षटकात इंग्लंडला मोहम्मद शमीने मोठा धक्का दिला. त्याने जोस बटलरला स्लोअर बॉल टाकत अप्रतिमरित्या त्रिफळाचीत केले. या विकेटचा व्हिडिओ देखील सध्या व्हायरल होत आहे. बटलरने १८ धावा केल्या.

इतकेच नाही तर ६ व्या षटकात सलामीवीर जेसन रॉयला देखील शमीने माघारी धाडले. रॉयचा १७ धावांवर जसप्रीत बुमराहने झेल घेतला. यानंतर शमीने १५ व्या षटकात खेळपट्टीवर स्थिरावलेल्या लियाम लिव्हिंगस्टोनला ३० धावांवर त्रिफळाचीत केले. शमीने या सामन्यात ४ षटके गोलंदाजी करताना ४० धावा देत ३ विकेट्स घेतल्या.

शमी व्यतिरिक्त जसप्रीत बुमराहने आणि राहुल चाहर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. दरम्यान, आर अश्विनला या सामन्यात विकेट मिळाली नाही, मात्र त्याची गोलंदाजी चांगली झाली. त्याने धावांवर अंकुश ठेवला होता. त्याने टाकलेल्या ४ षटकात इंग्लंडच्या फलंदाजांना केवळ २३ धावा करता आल्या. मात्र, भुवनेश्वर कुमार या सामन्यात सर्वात महागडा ठरला. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना एकही विकेट न घेता ५४ धावा दिल्या.

https://twitter.com/UTK_019/status/1450104471866916866

भारताचा विजय
इंग्लंडकडून या सामन्यात जॉनी बेअरस्टोने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. तसेच मोईन अलीने नाबाद ४३ धावांची खेळी केली. त्यामुळे इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद १८८ धावा केल्या.

भारताकडून १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीला आलेल्या केएल राहुल आणि इशान किशन या दोघांनी अर्धशतके केली. केएल राहुल ५१ धावा करुन बाद झाला. तर इशान किशन ७० धावा करुन रिटायर्ड हर्ट झाला. तसेच विराट कोहली ११ आणि सूर्यकुमार ८ धावांवर बाद झाले. तर अखेर, रिषभ पंतने नाबाद २९ आणि हार्दिक पंड्याने १२ धावा करत भारताला विजय मिळवून दिला. भारताने १९ षटकात ३ विकेट्स गमावत १९२ धावा करुन हा सामना जिंकला.

इंग्लंडकडून डेविड विली, लियाम लिव्हिंगस्टोन आणि मार्क वूडने प्रत्येकी १ विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या – 

लंकन वाघांनी पाडला नामिबियाचा फडशा; पहिल्या सामन्यात मिळवला दणदणीत विजय

इंग्लंडविरुद्ध सराव सामना जिंकल्यानंतरही ‘या’ दोन गोलंदाजांनी वाढवली टीम इंडियाची चिंता

टी२० विश्वचषकात टीम इंडियाबरोबर अखेरच्यावेळी काम करण्याबद्दल क्षेत्ररक्षक प्रशिक्षकांची भावनिक पोस्ट, म्हणाले…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---