भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने मागील २ वर्षांमध्ये भारतीय संघाकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तो वनडे आणि कसोटी या दोन्ही क्रिकेट प्रकारात भारतासाठी मॅच विनर (सामना विजेता) ठरला आहे.
जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीतही त्याने भारतीय संघात बुमराहची (Jasprit Bumrah) कमतरता जाणवू दिली नाही. असे असले तरीही आता शमीच्या या मेहनतीवर पाणी फिरणार असल्याचे दिसत आहे. कारण माध्यमांमध्ये अशा बातम्या येत आहेत की, कदाचित शमीचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी पाठविण्यात येणार नाही.
बीसीसीआयच्या (BCCI) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुमराह आणि शिखर धवन (Shikhar Dawan) यांचे नाव यावर्षी अर्जुन पुरस्कारासाठी (Arjun Award) पाठविण्यात येऊ शकते. परंतु यामध्ये शमीच्या नावाचा समावेश नसेल.
शमीचे नाव या पुरस्कारासाठी न पाठविण्याचे कारण त्याची पत्नी हसीन जहा (Hasin Jahan) आहे. तिने शमीवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप दाखल केला होता. त्यामुळे शमीचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी योग्य नसल्याचे बोलले जात आहे.
शमीची पत्नी हसीनने २०१८मध्ये त्याच्यावर मॅच फिक्सिंग, इतर मुलींशी अवैध संबंध आणि बलात्कारासारखे आरोप केले होते. तरीही हे आरोप सिद्ध झाले नाही. त्यामुळे शमी सध्या भारतीय संघाचा भाग आहे.
शमी आणि हसीन वेगवेगळे राहतात. त्यांना एक मुलगी आहे जी हसीनबरोबर राहते. शमी अनेकवेळा आपल्या मुलीला आठवून खूप भावूकदेखील झाला आहे.