---Advertisement---

मोहम्मद शमीचे मैदानात पुनरागमन! या मालिकेतून टीम इंडियासाठी करणार लवकरच कमबॅक

Mohammed-Shami-Injury
---Advertisement---

मोहम्मद शमीने भारतीय संघासाठी अंतिम सामना 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळला होता. या स्पर्धेत शमीने अप्रतिम गोलंदाजी केले होते. त्याने केवळ 7 सामने खेळून स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता. 11 सामन्यात 23 बळी घेणारा ॲडम झम्पा दुसऱ्या क्रमांकावर होता, तर शमी केवळ 7 सामन्यात 24 बळी घेऊन सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. एकदिवसीय विश्वचषक फायनलनंतर शमी दुखापतीमुळे अद्याप मैदानात परतू शकलेला नाही. मात्र, आता तो मैदानात परतला आहे.

सध्या शमी नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये आहे आणि तिथे त्याने नेटमध्ये गोलंदाजी सुरू केली आहे. शमीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसत आहे. शमी पूर्ण तीव्रतेने गोलंदाजी करत नसला तरी नेटवर त्याचे पुनरागमन काही प्रमाणात त्याच्या कमबॅकचे संकेत देत आहे.


सप्टेंबरमध्ये बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून शमी पुनरागमन करू शकतो. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही शमीबद्दल सांगितले होते की तो बांग्लादेशविरुद्धच्या घरच्या मालिकेतून पुनरागमन करू शकतो.

2023 च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान शमीला टाचेला दुखापत झाली होती. एकदिवसीय विश्वचषकानंतर शमी डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि जानेवारीमध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकला होता. भारतीय वेगवान गोलंदाजावर फेब्रुवारीमध्ये शस्त्रक्रिया झाली होती, ज्यामुळे तो 2024 च्या आयपीएल आणि टी20 विश्वचषकाला मुकला होता. मात्र, आता त्याच्या पुनरागमनाच्या चर्चा सर्वत्र होत आहे.

राष्ट्रीय संघात खेळणाऱ्या खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटसाठी स्वत:ला उपलब्ध ठेवावे, असे बीसीसीआय सचिवांनी नुकतेच स्पष्ट केले. अशा परिस्थितीत शमी पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्येही घाम गाळू शकतो. दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर देशांतर्गत क्रिकेट खेळणे हा एक चांगला पर्याय असेल, ज्यामुळे त्याला सामन्यातील फिटनेस परत मिळवणे सोपे होईल.

महत्तवाच्या बातम्या-

SL Vs Ind: भारताचा पुढचा टी20 कर्णधार म्हणून हार्दिक की सूर्या? लवकरच होणार घोषणा
निवृत्तीनंतर भारताच्या दिग्गज खेळाडूनं आईसाठी शेअर केली एक खास पोस्ट…!
महिला आयसीसी टी20 रँकिंगमध्ये हरमनप्रीत-शफालीनं मारली मुसंडी

 

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---