---Advertisement---

‘मनोबल खचलेले असताना…’, ड्रेसिंग रुममध्ये आलेल्या पंतप्रधान मोदींबाबत शमीची पहिली प्रतिक्रिया

On: गुरूवार, नोव्हेंबर 23, 2023 5:53 PM
Mohammad Shami Narendra Modi
---Advertisement---

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघातील खेळाडूंचे सांत्वन केल्याचा व्हिडिओ मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभव मिळाल्यानंतर मोदींनी थेट संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये भेट दिली होती. मोहम्मद शमी याचे कौतुक करत त्यांची पाठ थोपटली होती. आता शमीनेही मोदींच्या भेटीबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) हे दोन बलाढ्य संघ वनडे विश्वचषक 2023 (CWC 2023)च्या अंतिम सामन्यात आमने सामने होते. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना पाहण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले. पण भारताला 6 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियासाठी हा इतिहासातील सहावा वनडे विश्वचषक विजय ठरला. मोहम्मद शमी याची माठ स्वतः नरेंद्र मोदी यांनी थोपटल्यामुळे सोशल मीडियावर हा क्षण चर्चेचा विषय ठरला. ड्रेसिंग रुममध्ये मोदींनी सर्व भारतीय खेळाडूंना निराश न होण्यासाठी प्रत्सोहन दिले.

मोदींच्या ड्रेसिंग रुमधील भेटीबाबत शमीने नुकतीच खास प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी बोलताना शमीला मोदींच्या भेटीबाबत प्रश्न विचारला गेला. तेव्हा शमी म्हणाला, “जेव्हा पंतप्रधान मोदी तुम्हाला प्रोत्साहन देतात, तो क्षण खास असतो. मनोबल खचलेले असताना पतप्रधान तुमच्यासोबत असतील, तेव्हा आत्मविश्वास वाढतो.”

दरम्यान, मोहम्मद शमी वनडे विश्वचषक 2023मध्ये भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. शमीने एका सामन्यात 7, दोन सामन्यात प्रत्येकी 5-5, तरएका सामन्यात 4 विकेट्स घेतल्या आणि भारताला विजय मिळवून दिला. विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या चार सामन्यांमध्ये शमीला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. पण हार्दिक पंड्याच्या दुखापतीनंतर शमीला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले गेले. स्पर्धेतील सात सामन्यांमध्ये त्याने 24 विकेट्स नावावर केल्या, आणि विश्वचषक हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज देखील ठरला. (Mohammed Shami’s reaction to Prime Minister Narendra Modi’s dressing room visit)

महत्वाच्या बातम्या – 
‘क्रिकेट जिंकले आणि भारत हारला…’, WC Final मधील रोहितसेनेच्या पराभवाबद्दल पाकिस्तानी खेळाडूने ओकली गरळ
मोदी टॅायलेटमध्ये अभिनंदन स्विकारतील का? ड्रेसिंगरुममधील व्हिडीओनंतर पाहा कोणी केलीय टीका 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---