---Advertisement---

रोहितच्या दांड्या गुल, तरीही सिराजने का केलं नाही सेलीब्रेशन? समोर आलं कारण

On: शुक्रवार, मे 30, 2025 10:03 AM
---Advertisement---

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स MI vs GT यांच्यात 29 मार्च रोजी झालेल्या थरारक सामन्यात मोहम्मद सिराजने एक महत्त्वाची कामगिरी बजावली. गुजरात टायटन्सकडून गोलंदाजी करताना त्याने मुंबईचा स्टार सलामीवीर रोहित शर्मा याला जबरदस्त इनस्विंगरवर बोल्ड केलं. रोहित केवळ 4 चेंडूत 8 धावा काढून माघारी परतला. Rohit Sharma wicket

मोहम्मद सिराज विकेट घेतल्यानंतर सामान्यतः सेलिब्रेशन करतो. पण रोहित शर्माच्या विकेटनंतर सिराजने मात्र सयंम दाखवला. दरम्यान आता स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सिराजने स्पष्ट केलं की त्याने रोहितची विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन केलं नाही कारण रोहित हा एक वरिष्ठ (सिनीयर) खेळाडू आहे आणि तो त्याचा खूप आदर करतो.

यावेळी बोलताना सिराज म्हणाला, “मी रोहित भाईंचा खूप सन्मान करतो. जेव्हा मी त्यांना बाद केलं, तेव्हा सेलिब्रेट करणं मला योग्य वाटलं नाही. ते सिनीयर आहेत आणि भारतीय संघासाठी त्यांनी खूप काही दिलं आहे.” Mohammed Siraj disciplined reaction on Rohit Sharma

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, गुजरात टायटन्सने पहिल्या डावात खेळताना मर्यादित 20 षटकात 8 गडी गमावून 196 धावा केल्या होत्या. ज्यात साई सुदर्शनने सर्वाधिक 63 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सला 20 षटकात केवळ 6 गडी गमावून 160 धावा करता आल्या. आशाप्रकारे गुजरात टायटन्सने तो सामना 36 धावांनी जिंकला.

आयपीएल 2025 मधील एलिमिनेटर सामना आज (30मे) मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायन्स यांच्यात खेळवला जाणार आहे. या सामन्यात ज्या संघाचा पराभव होईल तो आयपीएल 2025 मधून बाहेर फेकला जाईल, तर सामना जिंकणारा संघ क्वाॅलिफायर 2 मध्ये पंजाब किंग्जशी भिडेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---