भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाकडून अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं.
प्रथम, मोहम्मद सिराजच्या चेंडूवर कर्णधार रोहित शर्मानं कव्हर्सच्या दिशेनं एका हातानं अप्रतिम झेल घेतला. कर्णधाराचा हा प्रयत्न पाहून सिराजचाही उत्साह वाढला. त्यानंतर सिराजनं आर अश्विनच्या चेंडूवर शाकिब अल हसनचा खतरनाक झेल घेतला. मोहम्मद सिराजच्या या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सिराजनं बांगलादेशच्या डावाच्या 56व्या षटकात हा झेल घेतला. दिवसाचं आपलं पहिलं षटक टाकत असलेल्या आर अश्विननं शेवटच्या चेंडूवर शाकिबला आपल्या जादुई फिरकीत अडकवलं. अश्विननं चेंडू हवेत स्पिन केला, ज्यावर शाकिबनं त्याच्या पावलांचा वापर करून मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. शाकिबचा चेंडू बॅटला पूर्णपणे लागला नाही आणि तो उंच हवेत उडाला.
मिडऑफला मोहम्मद सिराज फिल्डिंग करत होता. त्यानं आधी आपली कॅप काढली आणि नंतर पाठीमागे जात शानदार झेल घेतला. सिराजनं मागच्या बाजूनं उलटी डाइव्ह मारली. चेंडू त्याच्या विरुद्ध हातात जाऊन अडकला. या धक्कादायक कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाला. तुम्ही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.
What a catch by Siraj #INDvsBANTEST pic.twitter.com/wdd27cADnY
— 𝔸𝕪𝕒𝕒𝕟 (@yaan_Jatt) September 30, 2024
यापूर्वी रोहित शर्मानं सामन्याच्या 50व्या षटकात एक अप्रतिम झेल घेतला होता. रोहितनं मिडऑफवर लिटन दासचा हवेत डाइव्ह मारून एका हातानं झेल घेतला, ज्याचं देखील खूप कौतूक होत आहे. हे दोन्ही झेल पाहून
हेही वाचा –
‘रोहित शर्माला आरसीबीचे कर्णधार…’, लिलावाबाबत माजी खेळाडूचे वक्तव्य व्हायरल
रोहित नाही ‘सुपरमॅन’ म्हणा! एका हातानं असा झेल घेतला, ज्यावर कोणाचाच विश्वास बसेना! VIDEO
टी20 विश्वचषकात भारताची शानदार सुरुवात, सराव सामन्यात वेस्ट इंडिजला नमवले