भारतीय क्रिकेट संघाने हरारे येथे झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात झिम्बाब्वेला १३ धावांनी पराभूत करत मालिका ३-० ने जिंकली आहे. गेल्या ९ वर्षात भारतीय संघ झिम्बाब्वेत अपराजित राहिला आहे. अजेय राहण्याची ही मालिका भारतीय संघाने आताही कायम ठेवली आहे. या सामन्याचा भाग नसूनही वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सिराजला भेटण्यासाठी, त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी, त्याच्या ऑटोग्राफसाठी महिला चाहत्यांची गर्दी झाल्याचे दिसले आहे.
भारत विरुद्ध झिम्बाब्वे (India vs Zimbabwe) संघातील अखेरच्या वनडे सामन्यात (Third ODI) सिराजला (Mohammad Siraj) विश्रांती दिली गेली होती. त्यामुळे सामन्यादरम्यान सिराज मैदानात आला आणि सामना पाहायला आलेल्या दर्शकांशी गप्पा (Mohammad Siraj Interact Fans) मारताना दिसला. तिथे त्याला काही भारतीय चाहतेही भेटले. त्याने त्या चाहत्यांसोबत फोटो काढले आणि त्यांना ऑटोग्राफही दिले.
यादरम्यान सिराजची भेट काही महिला चाहत्यांशीही झाली. यामध्ये काही भारताच्या तर काही झिम्बाब्वेच्या महिला चाहत्या होत्या. सिराजला पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सिराजसोबत एक फोटो काढण्यासाठी, त्याच्याशी हात मिळवण्यासाठी त्यांचा घाई-गडबड पाहायला मिळाली. सिराजला भेटून या महिला चाहत्या आनंदी झाल्या. त्यांनी सिराजचे तोंडभरून कौतुक केले. तो खूप विनम्र असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघातील तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ८ विकेट्सच्या नुकसानावर २८९ धावा केल्या. या डावात भारताकडून सलामीवीर शुबमन गिलने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ९७ चेंडूत १ षटकार आणि १५ चौकारांच्या मदतीने १३० धावा केल्या. हे त्याचे वनडे कारकिर्दीतील पहिलेवहिले शतक होते. त्याच्या शतकी खेळीमुळे भारतीय संघाने झिम्बाब्वेपुढे २९० धावांचे आव्हान ठेवले.
प्रत्युत्तरात झिम्बाब्वेकडून सिकंदर रझानेही शानदार शतक झळकावले. त्याने ९५ चेंडूत ११५ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने ३ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने ही खेळी केली. परंतु ४९.३ षटकातच २७६ धावांवर झिम्बाब्वेचा संघ सर्वबाद झाला आणि त्यांनी १३ धावांनी सामना गमावला.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारताचा स्टार ऑलराऊंडर पंड्याला दुखापत! तब्बल ३ आठवडे राहणार क्रिकेटपासून दूर
एशिया कप २०२२मध्ये आपल्या बॅटची जादू दाखवायला तयार आहे केएल राहुल
बाबो! एका फुटबॉलपटूला संघात घेण्यासाठी मँचेस्टर युनायटेडला मोजावे लागले तब्बल ५५० कोटी