वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियामध्ये निवड झाली नाही. सिराज मागील काही काळापासून टीम इंडियाच्या प्रमुख वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. परंतु त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात स्थान मिळू शकले नाही. या दरम्यान आता अशी बातमी समोर आले आहे की टीम इंडियामधून बाहेर असलेला मोहम्मद सिराज रणजी ट्रॉफी खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
हैदराबादकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारा सिराज रणजी ट्रॉफीमध्ये संघाचा शेवटचा गट टप्प्यातील सामना खेळू शकतो. रणजी ट्रॉफीचा दुसरा टप्पा 23 जानेवारीपासून सुरू होणार आहे. हैदराबाद संघ दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना हिमाचल प्रदेशविरुद्ध खेळेल. सिराज हिमाचलविरुद्धच्या सामन्यात दिसणार नाही. तर त्यानंतर तो विदर्भाविरुद्धच्या गट टप्प्यातील शेवटच्या सामन्यात हैदराबादकडून खेळताना दिसू शकतो.
MOHAMMED SIRAJ IN RANJI TROPHY 🚀
– Siraj is likely to play Hyderabad’s last Ranji Trophy Group match vs Vidarbha. [Sahil Malhotra from TOI] pic.twitter.com/cwrOvpb76a
— Johns. (@CricCrazyJohns) January 19, 2025
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सिराज रणजी ट्रॉफीमध्ये दिसू शकतो. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “त्याच्या कामाच्या ताणामुळे तो पहिला सामना खेळणार नाही. पण, तो विदर्भाविरुद्धचा शेवटचा सामना खेळण्याची शक्यता आहे.”
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सिराजला टीम इंडियाचा भाग बनवण्यात आले नाही. इंग्लंड मालिकेत सिराजच्या जागी हर्षित राणाला स्थान देण्यात आले. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सिराजच्या जागी अर्शदीप सिंगला तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून स्थान देण्यात आले आहे. मात्र, हे लक्षात घेण्यासारखे आहे की अर्शदीपने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत फक्त 8 एकदिवसीय सामने खेळले आहेत. तो प्रामुख्याने टीम इंडियासाठी टी20 क्रिकेट खेळतो.
हेही वाचा-
मोहम्मद शमी पूर्णपणे तंदुरुस्त? सरावादरम्यान गुडघ्याला बांधली पट्टी; पाहा VIDEO
‘आम्ही आमचे सर्वोतपरी…’, कॅप्टन रोहित शर्माने घेतला चॅम्पियन्स ट्राॅफी भारतात आणण्याचा निर्धार!
IPL 2025: LSG लवकरच जाहीर करणार आपला कर्णधार, स्टार खेळाडूचे नाव शर्यतीत सर्वात पुढे