भारतीय संघ चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेची सुरवात विजयाने करू शकला नाही. पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 8 विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले. आता भारतीय संघाची नजर उर्वरीत 3 सामन्यावर आहे. यापूर्वी भारतीय संघाला मोहमद शम्मीच्या रूपाने मोठा धक्का बसला आहे. तो पहिल्या सामन्याच्या दुसर्या डावात जखमी झाला होता. त्यामुळे त्याला रिटायर्ड हर्ट व्हावे लागले होते.
माध्यमांच्या माहितीनुसार मोहम्मद शमी उर्वरीत तीन सामने खेळू शकणार नाही. अशा परिस्थितीत त्याच्या जागी वेगवान गोलंदाज मोहमद सिराजला संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे 26 डिसेंबरला ‘बॉक्सिंग डे’ दिवशी होणाऱ्या दुसर्या सामन्यात मोहमद सिराज खेळताना दिसू शकतो. स्पोर्ट्स टुडेच्या माहितीनुसार दुसर्या सामन्यात सिराज कसोटी सामन्यात पदार्पण करू शकेल. दुसरा सामना मेलबर्न येथे खेळला जाणार आहे.
पॅट कमिन्सच्या बाऊंसरवर शमीला झाली दुखापत
शनिवारी दुसर्या डावात फलंदाजी करत असताना, पॅट कमिन्सचा एक बाऊंसर चेंडू मोहम्मद शम्मीच्या उजव्या हातावर लागला होता. त्यामुळे तो फलंदाजी करू शकला नाही आणि रिटायर्ड हर्ट होवून माघारी परतला. परिणामी भारतीय संघाचा दुसरा डाव 36 धावसंख्येवर गडगडला. ही भारताच्या कसोटी इतिहासातील सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली.
शमीला दुखापत झाल्यामुळे लगेच मैदानावर संघाचे मेडिकल पथक पोहचले. काही कालावधीच्या नंतरही मोहम्मद शमीच्या वेदना कमी होत नव्हत्या. त्यामुळे त्याला ताबडतोब तंबूत नेण्यात आले. त्यांनतर भारतीय संघाचा डाव 21.2 षटकात 36/9, धावसंख्या असताना संपुष्टात आला. ऑस्ट्रेलिया संघाने हा सामना 8 विकेट्सने जिंकत या चार सामन्याच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली.
मोहमद सिराजची कामगिरी
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा आतापर्यंत एकही कसोटी सामना खेळलेला नाही. त्याने भारतीय संघात वनडेत 2019 साली आणि टी-20 मध्ये 2017 साली पदार्पण केले आहे. त्याने आतापर्यंत 1 वनडे सामना खेळला आहे. ज्यामध्ये एकही विकेट घेतली नाही. त्याचबरोबर 3 टी-20 सामने खेळताना 3 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल मध्ये 35 सामने खेळताना 39 विकेट्स घेतल्या आहेत. आता त्याला कसोटी सामन्यात पदार्पण करण्याची प्रतिक्षा आहे.
संबधित बातम्या:
– भारतीय संघाला मोठा धक्का, मोहम्मद शमी कसोटी मालिकेतून बाहेर
– मोहम्मद शमी मालिकेबाहेर, या गोलंदाजाला विनाविलंब ऑस्ट्रेलियाला पाठवा, गावसकरांची आग्रही मागणी
– बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय संघ उतरणार नव्या जोशात, होऊ शकतात हे ५ बदल