भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिकेला आजपासून (27 जुलै) सुरूवात होणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत सर्वांच्या नजरा भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर असतील. जर तुम्ही टीम इंडियाला थोडंसं फॉलो केलंत तर मोहम्मद सिराजने जवळपास प्रत्येक वेळी श्रीलंकेचं जगणं किती अवघड करून टाकलं आहे, हे तुमच्या लक्षात येईल.
आशिया चषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना असो किंवा इतर कोणताही सामना असो, सिराजने श्रीलंकेविरुद्ध नेहमीच उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. सिराजने श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात एकूण 6 विकेट घेतल्या होत्या. आशिया कप फायनलमध्ये सिराजच्या धारदार गोलंदाजीसमोर श्रीलंकेच्या फलंदाजांने गुडघे टेकले होते आणि संघ अवघ्या 50 धावांवर सर्वबाद झाला होता. चला तर मग जाणून घेऊया सिराजचा श्रीलंकेविरुद्धचा एकूण रेकॉर्ड काय आहे.
एकदिवसीय: सिराजने श्रीलंकेविरुद्धच्या वनडेमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. भारतीय वेगवान गोलंदाजाने श्रीलंकेविरुद्ध आतापर्यंत 6 डावात गोलंदाजी केली आहे, ज्यात त्याने 7.7 च्या सरासरीने तब्ब्ल 19 बळी घेतले आहेत.ज्यामध्ये त्याने केवळ 3.50 च्या इकॉनॉमीवर धावा खर्च केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेविरुद्ध सिराजची सर्वोत्तम गोलंदाजी 6/21 आहे, जी त्याने आशिया कप फायनलमध्ये (2023) गाठली.
टी20 आंतरराष्ट्रीय: मोहम्मद सिराजने श्रीलंकेविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये जास्त सामने खेळलेले नाहीत. भारतीय वेगवान गोलंदाजाने श्रीलंकेविरुद्ध केवळ 2 सामन्यात गोलंदाजी केली आहे, ज्यात त्याने 2 बळी घेतले आहेत. आता श्रीलंकेविरुद्ध यावेळी सिराज कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. बहुतेक लोकांच्या नजरा सिराजवर असतील.
भारत विरुद्ध श्रीलंका टी20 आणि एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
टी20 मालिका
पहिला टी20- 27 जुलै, शनिवार – पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पल्लेकेले
दुसरा टी20- 28 जुलै, रविवार – पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पल्लेकेले
तिसरा टी20- 30 जुलै, मंगळवार – पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पल्लेकेले
एकदिवसीय मालिका
पहिला एकदिवसीय – 02 ऑगस्ट, शुक्रवार – आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
दुसरी एकदिवसीय – 04 ऑगस्ट, रविवार – आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
तिसरी एकदिवसीय – 07 ऑगस्ट, बुधवार – आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
हेही वाचा-
पदकाचा दुष्काळ संपवण्यास खेळाडू सज्ज! पहिल्याच दिवशी या खेळातून खाते उघडण्याची अपेक्षा
IND vs SL: नव्या पर्वाला होणार सुरुवात; या कारणांमुळे टी20 मालिका ठरणार खास!
महिला आशिया कप 2024: श्रीलंकेची फायनलमध्ये थाटात एंट्री; उपांत्य फेरीत पाकिस्तानला पाजलं पाणी