---Advertisement---

RCB vs GT: हा ठरला गुजरातच्या विजयाचा टर्निंग पाँईंट

---Advertisement---

गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 8 गडी राखून पराभव केला. आयपीएल 2025 मध्ये, आरसीबी पहिल्यांदाच त्यांच्या होम ग्राउंडवर म्हणजेच एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळत होते, परंतु त्यांना निराशेचा सामना करावा लागला. सलग दोन विजय नोंदवल्यानंतर, बंगळुरूला गुजरातकडून पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात बेंगळुरूने प्रथम फलंदाजी करत 169 धावा केल्या, प्रत्युत्तरात गुजरातने 13 चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठले.

या सामन्यात गुजरात टायटन्स संघाच्या गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली ज्यामध्ये त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे 8 बळी घेण्यात यश मिळवले. आरसीबीने पॉवरप्लेमध्येच तीन विकेट गमावल्या, या सामन्यात मोहम्मद सिराजने गुजरातच्या विजयाचा पाया रचला. सिराजने तीन विकेट्स घेत आरसीबीला 169 धावांवर रोखले.

मोहम्मद सिराजने 4 षटकात 19 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. पाॅवप्लेमध्येच सिराजने 2 विकेट्स घेत आरसीबीचे कंबरडे मोडले. त्यामुळे संघ मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचू शकला नाही. सिराजच्या कामगिरीमुळे त्याला सामनावीरचा पुरस्कार मिळाला.

आरसीबीने दिलेल्या 170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सला 32 धावांवर पहिला झटका बसला. शुबमन गिल 14 धावांवर बाद झाला. साई सुदर्शन (49) आणि जोस बटलरने महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. बटलरने 39 चेंडूत नाबाद 73 धावा (5चौकार, 6 षटकार) फटकावत संघाला विजय मिळवून दिला. शेरफेन रदरफोर्डनेही 18 चेंडूत नाबाद 30 धावा केल्या.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---