आयपीएलच्या धर्तीवर पाकिस्तानने सुरु केलेली पाकिस्तान सुपर लीग या व्यवसायिक टी२० क्रिकेट लीगचा सहावा हंगाम सध्या पाकिस्तानमध्ये खेळवला जातोय. या लीगमध्ये पाकिस्तानसह विदेशातील अनेक नामांकित खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत कराची किंग्सकडून खेळणाऱ्या पाकिस्तानच्या मोहम्मद आमीरच्या एकाच षटकात लाहोर कलंदर्सच्या फलंदाजांनी सामना फिरवत रोमहर्षक विजय मिळवला. त्यामुळे, आमीरला कराचीच्या पराभावासाठी जबाबदार धरले गेले.
लाहोर कलंदर्सचा रोमहर्षक विजय
पीएसएलमध्ये २८ फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या सामन्यात लाहोर कलंदर्सने कराची किंग्सला पराभूत करत एका खळबळजनक विजयाची नोंद केली. कराचीने दिलेल्या १८७ धावांचा पाठलाग करताना, लाहोर कलंदर्सला १२ चेंडूमध्ये ३० धावांची आवश्यकता होती.
आमीरची धुलाई आणि सामना फिरला
लाहोरचा कर्णधार इमाद वसिमने १९ वे षटक टाकण्याची जबाबदारी संघाचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरवर दिली. आधीच्या तीन शतकांमध्ये केवळ १४ धावा देणाऱ्या आमीरकडून त्याला तशाच गोलंदाजीची अपेक्षा होती. मात्र, बेन डंक व डेव्हिड विजे या लाहोरच्या फलंदाजांनी त्याची अशी धुलाई केली जशी पीएसएल इतिहासात कोणत्याही गोलंदाजाची झाली नव्हती.
ऑस्ट्रेलियाच्या डावखुऱ्या बेन डंकने पहिल्याच चेंडूवर चौकार वसूल करा नंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. त्यानंतर स्ट्राइकवर आलेल्या डेव्हिड विजेने सलग दोन चौकार मारत कराचीच्या गोटातील वातावरण गंभीर केले. पाचव्या चेंडूवर षटकार ठोकत त्याने सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकविला. अखेरच्या चेंडूवर एक धाव घेत त्याने हे षटक २० धावांचे बनविले. त्यामुळे, हातातोंडाशी आलेला विजयाचा घास कराची किंग्सपासून दूर गेला.
https://twitter.com/noisyArqam/status/1366100629148598279?s=20
अखेरच्या षटकात केली विजयाची पूर्तता
आमीरच्या या महागड्या षटकामुळे सामना पूर्णतः लाहोरच्या पारड्यात गेला होता. डेविड विजेने अखेरच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूवरच १० धावा घेत संघाला विजयी केले.
महत्त्वाच्या बातम्या-
“प्रतिक्षेत पडणार भर, कुलदीप-मयंकला चौथ्या कसोटीतही राहावे लागणार संघाबाहेर”
‘आय ऍम बार्बी गर्ल’ म्हणतं हार्दिक पंड्याच्या बायकोचा भन्नाट डान्स, व्हिडिओ होतोय व्हायरल
अरेरे! बड्डेदिनी आफ्रिदी झाला ट्रोल; नेटकरी म्हणाले, ‘४१, ४४ का ४६ नक्की कितवा वाढदिवस?’






