आयपीएल (IPL) 2023चा लिलाव शुक्रवारी (23 डिसेंबर) कोचि येथे पार पडला. हा लिलाव सुरू होण्याआधी सनरायझर्स हैद्राबादकडे सर्वाधिक रक्कम होती. तसेच त्यांच्या सर्वाधिक जागाही रिकाम्या होत्या. हैद्राबादकडे 42.25 कोटी रुपये पाकिटात होते, तर 13 जागा रिक्त होत्या. त्यांनी या रकमेचा योग्य फायदा करत आपल्या संघाला आणखी मजबूत करण्याचे काम केले. असे असतानाच सनरायझर्स हैदराबादसाठी खेळलेला अफगाणिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद नबी याने या संघावर टीका केली आहे.
नबी हा 2017 ते 2021 या कालावधीत हैदराबाद संघाचा भाग होता. त्यानंतर मागील वर्षी त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. मात्र, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. आयपीएल 2023 लिलावासाठी देखील त्याने आपले नाव नोंदवले होते. मात्र, या लिलावात त्याच्यावर कोणीही बोली लावली नाही.
आयपीएल लिलावानंतर नबी एका कार्यक्रमात बोलत होता. यावेळी त्याने आयपीएलमधील आपले अनुभव सांगितले. मात्र, त्याचवेळी त्याने आपला पूर्वाश्रमीचा आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबाद संघावर टीका केली. तो म्हणाला,
“सनरायझर्स हैदराबादने राशिद खान व डेव्हिड वॉर्नर या प्रसिद्ध खेळाडूंना जशी वागणूक दिली, तशी वागणूक द्यायला नको होती.”
हैदराबादने 2021 आयपीएल लिलावावेळी डेव्हिड वॉर्नर याला हंगामाच्या मध्यातून कर्णधारपदावरून हटवले होते. तसेच, त्याला बारावा खेळाडू म्हणून देखील मैदानात पाठवण्यात आलेले. त्यानंतर त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला. तर, 2022 आयपीएलवेळी राशिद खान याला मोठी रक्कम न देता संघाबाहेर जाऊ दिलेले. त्यावेळी हा मुद्दा बराच चर्चिला गेला होता.
(Mohmmad Nabi Slams Sunrisers Hyderabad For Not Respecting Rashid And Warner)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
काय योगायोग म्हणावा हा! उनाडकटने शेअर केला आपल्या दोन जर्सींचा फोटो, यामध्ये एक खेळाडू आहे कॉमन
‘धोनी भाईशी माझी तुलना होते, तेव्हा मी…’, बांगलादेशचे मैदान मारणाऱ्या ईशान किशनची खास प्रतिक्रिया