ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करताना पहिला विजय नोंदवला आणि तीन सामन्याच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. परंतु या विजयानंतर ही विराट कोहलीच्या एका निर्णयावर भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने टीका केली आहे. मोहमद कैफने पहिल्या टी-20 सामन्यात श्रेयस अय्यरचा संघात समावेश केला नसल्यामुळे विराटच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला. यासोबतच त्याने माजी भारतीय कर्णधाराचे उदाहरण देत विराटने त्याच्याप्रमाणे नेतृत्त्व करावे, असेही सांगितले.
तो म्हणाला, खराब वेळेत खेळाडूची साथ न देणे योग्य नाही, माजी कर्णधार सौरभ गांगुली आपल्या काळात खराब वेळेत खेळाडूला साथ देत होते.
सौरव गांगुली सोबत तुलना
सौरव गांगुलीसोबतच्या आठवणीला उजाळा देताना कैफ म्हणाले की, “जेव्हा आम्ही दादासोबत खेळत होतो, तेव्हा असे नव्हते. दादा जर कोणत्या खेळाडूला निवडत होता, तर तो त्याला खेळवत होते. जोपर्यंत त्यांना या गोष्टीचा विश्वास होता की, हा खेळाडू चांगले करू शकतो. त्याच्यासारखा विराट कोहलीलाही कर्णधार म्हणून असा विचार करायला हवा. शेवटी आम्ही का दादाबद्दल बोलतो?, सेहवाग का दादाबद्दल बोलत असतो? कारण की दादाने हा ठसा उमटविला आहे. त्यांने संघ बनवलाय.”
“अशातच जेव्हा विराट कोहली आजपासून 8-10 वर्षांनंतर निवृत्ती घेईल, तेव्हा असे खेळाडू असायला हवे जे त्याचे नाव घेतील आणि तो मोठा खेळाडू होवो. तो पहिलाच महान खेळाडू आहे, त्यामुळे त्याने विकसित होत असलेल्या खेळाडूंना साथ देणे गरजेचे आहे. कोहलीला एक आदर्श सोडण्याची गरज आहे.”
अय्यर महत्वाचा खेळाडू
पहिल्या टी-20 सामन्यात श्रेयस अय्यरला संघात सामील केले नव्हते. यापूर्वी पहिल्या तीन वनडे सामन्यात अय्यर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांपुढे अडखळताना दिसला होता. कैफ म्हणाले, अय्यरने वेगवेगळ्या क्रमांकावर न्यूझीलंड विरुद्ध चांगली कामगिरी साकारली होती. आयपीएलमध्ये ही उत्तम फलंदाजी करताना दिसला. सध्याच्या घडीला अय्यर महत्त्वाचा खेळाडू आहे. चौथ्या क्रमांकावर तो खूप महत्त्वपूर्ण फलंदाज आहे. आयपीएल किंवा न्यूझीलंड मालिकेबद्दल बोलायचे, तर जेव्हा तो चार क्रमांकावर फलंदाजी केली होती, तेव्हा त्याने 33 चेंडूवर 50 धावांची खेळी केली होती.
निर्णयावर उपस्थित केला प्रश्न
कैफ म्हणाला की, अय्यरने दोन तीन वनडे डावात खास नाही केले, यामुळे पहिल्या टी-20 सामन्यात त्याचा संघात समावेश नाही केला. ही भारतीय संघाची संस्कृतीच आहे, याला आम्ही समजतो. मी या गोष्टीवरून आश्चर्यचकीत नाही की, त्याला संघात स्थान दिले नाही, ही रवी शास्त्री आणि विराट कोहली यांची विचारधारा आहे. खेळाडूंना हे समजतात, खेळाडूंना माहित आहे की त्यांना अजून दोन डाव मिळणार.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट ऐवजी रोहित शर्माला टी२० संघाचे कर्णधारपद देण्याची गरज नाही, भारतीय दिग्गजाचे मत
…. म्हणूनच जसप्रीत बुमराह यशस्वी गोलंदाज, ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने उधळली स्तुतीसुमने
पहिल्या कसोटीत न्यूझीलंडचा वेस्ट इंडिजवर मोठा विजय, ‘हा’ खेळाडू ठरला सामनावीर
ट्रेंडिंग लेख-
मराठीत माहिती- क्रिकेटर जसप्रीत बुमराह
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग
मराठीत माहिती- क्रिकेटर श्रेयस अय्यर