मुंबई । जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. दररोज हजारो लोक मरत आहेत. कोरोनामुळे, मार्चपासून जगात कोणतीही मोठी घटना घडलेली नाही.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्व प्रमुख क्रीडा कार्यक्रम रद्द केले गेले किंवा पुढे ढकलले गेले. असे असूनही, बीसीसीआय संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयपीएल स्पर्धा आयोजित करण्यावर ठाम आहे.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी दुबईला दाखल झालेल्या सीएसके संघाचे दोन खेळाडू आणि 11 सदस्य कोरोनाने संक्रमित झाले आहेत.
अशा परिस्थितीत खेळाडूंचे जीवन अधिक महत्त्वाचे आहे की बीसीसीआयसाठी पैसा?असा आयपीएलच्या आयोजनावर सातत्याने प्रश्न विचारले जात आहेत. खेळाडूंचे जीवन धोक्यात घालून बीसीसीआय आयपीएलचे आयोजन का करत आहे? असा सवाल विचारला जात आहे.
Cancel the IPL.
Health matters more than sports and money— 𝘼𝙨𝙝-𝗐𝗂𝗇 𝖥𝖾𝗋𝗇-&-𝙚𝙨 (@ashshanuferns) August 29, 2020
Cancel the IPL for this year…BCCI is putting lives of players at stake#Cancel_IPL2020
— GSD (@DasSnehshil) August 29, 2020
Will they reschedule the ipl since csk staffs have been tested positive??
— krishna krishna (@krishna20609291) August 29, 2020
देशात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सरकारने सर्व प्रकारच्या खेळ, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयने यावेळी युएईमध्ये ही स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला आहे. जेथे आयपीएलचा पहिला सामना 19 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
निकोलस पूरन ठोकले टी 20 क्रिकेटमध्ये पहिले वादळी शतक; गयाना वॉरियर्सने सेंट किट्सला चारली धूळ
दुबईमध्ये हातात बॅट घेताच विराट कोहली घाबरला; जाणून घ्या काय होते कारण
श्रेयस अय्यरने सांगितले हे काम केल्यावर दिल्ली कॅपिटलची टीम होणार चॅम्पियन
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष- भारताचा दिग्गज गोलंदाज जवागल श्रीनाथबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ
सुरैश रैनाऐवजी यंदा हे ३ खेळाडू बनू शकतात चेन्नई सुपर किंग्सचे उपकर्णधार