पुणे। फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी तर्फे आयोजित व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत इमर्जिंग स्टार गटात उपांत्य फेरीत मॉँट व्हर्ट प्रीस्टाईन 2, एसेस युनायटेड या संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश केला.
फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत इमर्जिंग स्टार गटात उपांत्य फेरीत सुनील लुल्ला, मयूर पारेख, रतिश रतुसारिया, रोहन नाईक, तस्मित साहनी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर एसेस युनायटेड संघाने मॉँट व्हर्ट प्रीस्टाईन 1 संघाचा 34-19 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात मॉँट व्हर्ट प्रीस्टाईन 2 संघाने डेक्कन आरएफ संघाचा 43-36 असा पराभव करून आगेकूच केली. विजयी संघाकडून राहुल मंत्री, दिलीप धामणकर, अमलेश आठवले, नितीन गवळी यांनी सुरेख कामगिरी बजावली.
निकाल: इमर्जिंग स्टार गट:
एसेस युनायटेड वि.वि.मॉँट व्हर्ट प्रीस्टाईन 1 34-19(100 अधिक गट: सुनील लुल्ला/मयूर पारेख वि.वि.व्ही नटराजन/सूरज झंझोटे 10-4; 90 अधिक गट: जयदीप अगरवाल/सुनील खेमचंदानी पराभूत वि.संजीव माधव/विकास चौधरी 4-10; खुला गट: सुनील लुल्ला/रतिश रतुसारिया वि.वि.विनोद ओरसे/धैर्यशील गोहिल 10-2; खुला गट: रोहन नाईक/तस्मित साहनी वि.वि.नरेश अरोरा/सुयश नाबर 10-3);
मॉँट व्हर्ट प्रीस्टाईन 2 वि.वि.डेक्कन आरएफ 43-36(100 अधिक गट: राहुल मंत्री/दिलीप धामणकर वि.वि.आर सुधाकर/जॉर्ज वरघसे 13-11; 90 अधिक गट: आशिष धोंगडे/समीर सावला पराभूत वि.मनीष टिपणीस/सचिन माधव 3-10; खुला गट: श्रीनिवास रामदुर्ग/संदीप माहेश्वरी पराभूत वि.सतीश ओरसे/सोमनाथ पवार 8-10; खुला गट: अमलेश आठवले/नितीन गवळी वि.वि.रवी जौकनी/राजेश मित्तल 12-10)
महत्त्वाच्या बातम्या –
महागुरू द्रविडने कमी केला होता पदार्पणवीर आवेश खानवरचा दबाव, दिला होता ‘हा’ झक्कास मंत्र
चौथ्या सांघिक आंतर क्लब टेनिस स्पर्धेत टायगर्स, लायन्स, एफसी जीएनआर संघांची आगेकूच