ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज डेविड वॉर्नरची बॅट आयपीएलमध्ये चांगलीच तळपतेय. तो प्रत्येक सामन्यात आपल्या बॅटमधून धावांचा पाऊस पाडताना दिसतोय. गुरुवारी (दि. २८ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात आयपीएलचा ४१वा सामना वानखेडे स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात डेविड वॉर्नरने आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताविरुद्ध एक खास कारनामा केला.
दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) या सामन्यात नाणेफेक जिंकत कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी कोलकाताने ९ विकेट्स गमावत १४६ धावा चोपल्या. कोलकाताच्या १४७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीकडून सलामीला पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि मिशेल मार्श (Mitchell Marsh) आले होते. यावेळी शॉ पहिल्याच चेंडूवर गोल्डन डक (शून्यावर बाद) झाला. त्यानंतर फलंदाजीला डेविड वॉर्नर (David Warner) आला. वॉर्नरने येताक्षणीच चौकार लगावला. यानंतर त्याने पुढेही फटकेबाजी सुरूच ठेवली. वॉर्नरने या सामन्यात एकूण ४२ धावा केल्या. यामध्ये ८ चौकारांचा समावेश होता. यादरम्यान त्याने डावाच्या सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर एक धाव घेत २४ धावा पूर्ण करताच एक खास कामगिरी केली. त्याने कोलकाताविरुद्ध आपल्या १००० धावांचा टप्पा पूर्ण केला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
या कामगिरीसह तो आयपीएलमध्ये एका संघाविरुद्ध १००० धावांचा टप्पा पूर्ण करणारा चौथा खेळाडू बनला. त्याच्यापूर्वी शिखर धवन आणि रोहित शर्माने अशी कामगिरी केली होती. धवनने चेन्नईविरुद्ध १०२९ धावा चोपल्या आहेत, तर रोहितने कोलकाताविरुद्ध १०१८ धावा फटकावल्या होत्या. या यादीत तिसऱ्या स्थानी डेविड वॉर्नर असून त्याने कोलकाताविरुद्ध १११८ धावा चोपल्या आहेत. या यादीत चौथ्या स्थानीही वॉर्नरच आहे. त्याने पंजाब किंग्सविरुद्ध १००५ धावा केल्या होत्या.
आयपीएलमध्ये एका संघाविरुद्ध १००० धावा करणारे फलंदाज
१०२९ धावा- शिखर धवन (विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स)
१०१८ धावा- रोहित शर्मा (विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स)
१०१८ धावा- शिखर धवन (विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स)*
१००५ धावा- डेविड वॉर्नर (विरुद्ध पंजाब किंग्स)
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भल्याभल्या फलंदाजांच्या दांड्या गुल करणाऱ्या उमरानची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘एके दिवशी…’
वेगाचे बादशाह! उमरान मलिक ते इशांत शर्मा, जाणून घ्या कोण आहे भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज