नोव्हेंबर महिन्यात भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. तिथे दोन्ही संघात होणाऱ्या वनडे आणि टी२० मालिकेसाठी गुरुवारी (२९ ऑक्टोबर) क्रिकेट ऑस्ट्रेलियाने १८ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात दुखापतग्रस्त मिचेल मार्शच्या जागी अष्टपैलू खेळाडू मोसेस हेन्रीक्सला स्थान देण्यात आले आहे. परंतु सर्वांना ऐकून आश्चर्य वाटेल की, एकेकाळी हाच खेळाडू आत्महत्या करायला निघाला होता.
आत्महत्या करण्याचे बनवले होते मन
३३ वर्षीय मोसेस हेन्रीक्सने २००९ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. पण काही वर्षांनंतर त्यांचा फॉर्म बिघडला. त्यामुळे त्याला संघातून बाहेर करण्यात आले होते. त्यानंतर आपल्या खराब प्रदर्शनामुळे हेन्रीक्स डिप्रेशनमध्ये गेला होता आणि त्याने आत्महत्या करण्याचे ठरवले होते.
एकदा स्वत: मोसेस हेन्रीक्सने याचा खुलासा करत सांगितले होते की, ‘डिप्रेशनमुळे त्याला साधे २-३ तासही झोप येत नसायची. त्यामुळे त्याचे आरोग्य खूप बिघडले होते. केवळ एका महिन्यात त्याचे तब्बल १० किलो वजन घटले होते. दरम्यान त्याने आत्महत्या करण्याचेही ठरवले होते. पण शेवटी ३ महिन्यांच्या वाईट कालावधीनंतर त्याने स्वत:ला सावरले आणि जिवनाची नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.
३ वर्षांनंतर होईल ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन
मोसेस हेन्रीक्सने ऑक्टोबर २०१७ ला भारतीय संघाविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. दरम्यान त्याचा फॉर्म बिघल्यामुळे पुढे त्याला संघात स्थान मिळाले नाही. परंतु गतवर्षी त्याने बिग बॅश लीगच्या सिडनी सिक्सर्स संघाला विजेता बनवण्यात मोलाचा वाटा दिला. त्यामुळे आता भारताविरुद्ध जवळपास ३ वर्षांनंतर त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन होणार आहे.
मोसेस हेन्रीक्सची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
मोसेस हेन्रीक्सची आंतरराष्ट्रीय कारकिर्द जास्त विशेष राहिलेली नाही. त्याने आतापर्यंत ११ वनडे सामने खेळले असून ८१ धावा आणि ७ विकेट्स घेतल्या आहेत. तर ४ कसोटी सामन्यात त्याने १६४ धावा आणि २ विकेट्सची कामगिरी केली आहे. या तुलनेत त्याची टी२० क्रिकेटमधील आकडेवारी थोडी चांगली आहे. मोसेस हेन्रीक्सने आतापर्यंत ११ टी२० सामने खेळले असून १५९ धावा केल्या आहेत. तसेच ४ फलंदाजांना त्याने पव्हेलियनला रस्ता दाखवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अभिनेत्री पायल घोषने ‘या’ भारतीय क्रिकेटर केले गंभीर आरोप, म्हणाली…
केकेआरला पराभवाची धूळ चारण्यात चेन्नईच्या ‘या’ खेळाडूचे ‘सिक्स पॅक’ आले कामी
मुंबई इंडियन्सचं टीम मॅनेजमेंट लई भारी, पाहा कोण म्हणतंय असं
ट्रेंडिंग लेख-
IPL 2020 – धोनीच्या ‘या’ पाच पठ्ठ्यांनी कोलकाताच्या सेनेला दाखवले आस्मान
CSK vs KKR सामन्यात ऋतुराज गायकवाडसह ‘या’ खेळाडूंनी केले खास ५ विक्रम
त्याला संघात घेण्यासाठी प्रशिक्षकाने भांडून बोर्डाला नियम बदलायला लावले होते…