दुबई। 23 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान संघात एशिया कप 2018च्या सुपर फोरचा सामना पार पडला. हा सामना भारताने 9 विकेट्स जिंकला आहे.
या सामन्यात भारताचे सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि शिखर धवनने द्विशतकी भागीदारी रचली आहे. याबरोबरच एक खास विक्रमही या जोडीने केला आहे.
त्यांनी वनडे क्रिकेटमध्ये सलामीला खेळताना आत्तापर्यंत 13 वेळा 100 पेक्षा अधिक धावांची भागीदारी रचली आहे. हा पराक्रम करताना त्यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवागच्या जोडीला मागे टाकले आहे.
सचिन आणि सेहवागने वनडेमध्ये 12 वेळा सलामीला खेळताना 100 पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर सचिन आणि सौरव गांगुलीची जोडी आहे. त्यांनी 21 वेळा पहिल्या विकेटसाठी 100 पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली आहे.
या सामन्यात शिखर आणि रोहितने 210 धावांची द्विशतकी पहिल्या विकेटसाठी भागीदारी केली आहे. या बरोबरच या दोघांनीही पाकिस्तानने दिलेल्या 238 धावांच्या लक्ष्याचे पाठलाग करताना शतके केली आहे.
रोहितने 119 चेंडूत 111 धावांची नाबाद शतकी खेळी केली. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 4 षटकार मारले.तसेच शिखरने 100 चेंडूत 114 धावा करताना 16 चौकार आणि 2 षटकार मारले.
पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक वेळा शतकी भागीदारी करण्याच्या यादीत शिखर आणि रोहितची जोडी एकूण चौथ्या क्रमांकावर आहे.
याबरोबरच शिखर आणि रोहितच्या जोडीने वनडेमध्ये पाकिस्तान विरुद्धही आणि एशिया कप स्पर्धेतीलही भारताकडून पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक धावांची भागीदारी रचली आहे.
पहिल्या विकेटसाठी सर्वाधिक वेळा 100 धावांपेक्षा जास्त धावांची भागीदारी-
21 – सचिन तेंडुलकर – सौरव गांगुली
16 – अॅडम गिलख्रिस्ट – मॅथ्यू हेडन
15 – गोर्डन ग्रिनिज – डेसमोन्ड हॅइन
13 – रोहित शर्मा – शिखर धवन
12 – सचिन तेंडुलकर – विरेंद्र सेहवाग
महत्वाच्या बातम्या –
–…आणि पाकिस्तानचे चाहते जोरदार भडकले
-पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यरने रेल्वेला धु-धु धुतले, मुंबईचा ४०० धावांचा डोंगर
-रोहित शर्मा आणि शिखर धवन ही जगातील सर्वात विध्वंसक जोडी