---Advertisement---

केवळ ३७ सामने खेळणाऱ्या कुलदीप यादवचा झाला तेंडुलकर-कुंबळे या दिग्गजांच्या यादीत समावेश

---Advertisement---

माऊंट मॉनगनुई। भारताने आज (26 जानेवारी) बे ओव्हल मैदानावर झालेल्या दुसऱ्या वन-डे सामन्यात न्यूझीलंडवर 90 धावांनी विजय मिळवला आहे. यामुळे भारत 5 सामन्यांच्या वन-डे मालिकेत 2-0ने आघाडीवर आहे.

या सामन्यात भारताकडून चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने सर्वाधिक 4 विकेट्स पटकावल्या आहेत. त्याने 45 धावा देताना हेन्री निकोलास, कॉलीन डी ग्रँडहोम, टॉम लॅथम आणि इश सोधी या न्यूझीलंडच्या चार फलंदाजांना बाद केले आहे.

यावेळी कुलदीप वन-डे क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात चार किंवा चार पेक्षा अधिक विकेट्स घेणारा पाचवा भारतीय फिरकीपटू फलंदाज ठरला आहे. त्याने 37 वन-डे सामने खेळताना 5 वेळा एकाच सामन्यात चार किंवा चार पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

याआधी अनिल कुुंबळेने 269 सामने खेळताना सर्वाधिक 10 वेळा चार किंवा चार पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

सर्वाधिक वेळा एका वन-डे सामन्यात चार किंवा चार पेक्षा अधिक विकेट्स घेणारे भारतीय फिरकीपटू-

10 वेळा – अनिल कुंबळे (269 सामने)

8 वेळा – रवींद्र जडेजा (147 सामने)

6 वेळा – सचिन तेंडुलकर (463 सामने)

5 वेळा – हरभजन सिंग (234 सामने)

 5 वेळा – कुलदीप यादव (37 सामने)*

महत्त्वाच्या बातम्या-

एमएस धोनीकडून ब्रायन लारा, कॅलिस या दिग्गजांचा विक्रम मोडीत

प्रजासत्ताक दिनी अर्धशतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माचा अनोखा पराक्रम

स्टम्पिंगचा बादशहा एमएस धोनीची चपळाई पाहून फलंदाजही झाला चकीत, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment