नॉटींगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंटब्रिज मैदानावर पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने 203 धावांनी मोठा विजय मिळवला.
भारताने जिंकलेल्या या सामन्यात विराट कोहलीने दोन्ही डावात मिळुन बरोबर २०० धावा केल्या. या २०० धावांत विराटने २१ चौकार मारले.
याबरोबर कर्णधार म्हणुन विजय मिळवलेल्या सामन्यात सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम विराटच्या नावावर झाला आहे.
विराटने कर्णधार म्हणुन विजय मिळवलेल्या सामन्यात तब्बल ५१५ चौकार मारले आहेत. ७२ आंतरराष्ट्रीय सामन्यातच त्याने हा कारनामा केला आहे.
तर एमएस धोनीने १७८ सामन्यात ५०३ चौकार आणि सौरव गांगुलीने ९७ सामन्यात ४८३ चौकार मारले आहेत. कोहली धोनीपेक्षा १०६ सामने कमी तर गांगुलीपेक्षा २५ सामने कमी जिंकला आहे. तरीही तो हा मोठा कारनामा करु शकला आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–अखेर कोहलीच्या टीम इंडियाने तिसऱ्या कसोटीत इंग्लंडला पाजले पाणी
–कसोटी सामन्यात संपुर्ण दिवसात टाकले गेले होते केवळ दोन चेंडू
–पाचव्या दिवशी १ विकेट बाकी असताना यापुर्वी १० सामन्यांत नक्की काय झाले होते?