गयाना। मंगळवारी(6 ऑगस्ट) वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघात तिसरा टी20 सामना प्रोविडन्स स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवत 3 सामन्यांची टी20 मालिका 3-0 अशी जिंकली.
भारताच्या या विजयात विराट कोहलीने 45 चेंडूत 59 धावांची आणि रिषभ पंतने 42 चेंडूत 65 धावांची अर्धशतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला.
विराटचे हे आंतरराष्ट्रीय टी20मधील 21 वे अर्धशतक होते. त्यामुळे त्याने आता आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याच्या रोहित शर्माच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे.
रोहितनेही 21 वेळा आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. विशेष म्हणजे त्याने हा विश्वविक्रम 4 ऑगस्टला याच टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 67 धावांची अर्धशतकी खेळी करत केला होता.
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक वेळा 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारे खेळाडू-
21- रोहित शर्मा, सामने- 96
21- विराट कोहली, सामने- 70
16- मार्टिन गप्टील, सामने- 76
15- ख्रिस गेल, सामने- 58
15- ब्रेंडन मॅक्क्यूलम, सामने- 71
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–स्टिव्ह स्मिथने कसोटी क्रमवारीत घेतली मोठी झेप; विराटचे अव्वल स्थान धोक्यात
–मैदानात पाऊल टाकताच राहुल चाहरचा झाला या खास यादीत समावेश
–दुसऱ्या ऍशेस सामन्याआधी इंग्लंडला मोठा धक्का!