मँचेस्टर। आज (27 जून) 2019 क्रिकेट विश्वचषकात 34 वा सामना ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडीयमवर भारत विरुद्ध विंडीज संघात सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 268 धावा केल्या आहेत. भारताकडून कर्णधार विराट कोहली आणि एमएस धोनीने अर्धशतकी खेळी केल्या.
विराटने या सामन्यात 82 चेंडूत 72 धावांची खेळी करताना 8 चौकार मारले. तर धोनीने 61 चेंडूत नाबाद 56 धावांची खेळी केली. त्याने या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकार मारले. या अर्धशतकाबरोबरच धोनीने खास पराक्रम केला आहे.
धोनीचे हे वनडे कारकिर्दीतील 72 वे अर्धशतक होते. त्यामुळे त्याने वनडेमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत सौरव गांगुलीची बरोबरी केली आहे. गांगुलीनेही वनडेमध्ये 72 अर्धशतके केली आहेत. यामुळे आता या यादीत गांगुली आणि धोनी संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
या यादीत अव्वल क्रमांकावर 96 अर्धशतकांसह अव्वल क्रमांकावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर 83 अर्धशतकांसह राहुल द्रविड आहे.
भारताकडून धोनीची गांगुलीपेक्षा अधिक अर्धशतके –
गांगुलीने वनडेमधील केलेल्या 72 अर्धशतकांपैकी 71 अर्धशतके भारताकडून खेळताना केली आहेत तर 1 अर्धशतक त्याने आशिया एकादश संघाकडून अफ्रिका एकादश संघाविरुद्ध खेळताना खेळताना केले होते.
तसेच धोनीनेही अशिया एकादशकडून कारकिर्दीतील तीन वनडे सामने खेळले आहेत. पण या तीन सामन्यात त्याने आशिया एकादश संघाकडून एकही अर्धशतक न करता एक शतक केले आहे. त्यामुळे धोनीने कारकिर्दीतील 72 अर्धशतके ही भारताकडून खेळताना केली आहेत.
#वनडेत सर्वाधिक अर्धशतके करणारे भारतीय खेळाडू-
96- सचिन तेंडूलकर
83- राहुल द्रविड
72- एमएस धोनी
72- सौरव गांगुली
58- मोहम्मद अझरुद्दीन
53- विराट कोहली
#वनडेत भारताकडून सर्वाधिक अर्धशतके करणारे खेळाडू-
96- सचिन तेंडूलकर
82- राहुल द्रविड
72- एमएस धोनी
71- सौरव गांगुली
58- मोहम्मद अझरुद्दीन
53- विराट कोहली
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–धवन, विराटला मागे टाकत बाबर आझमने रचला नवीन विश्वविक्रम
–असा भीम पराक्रम करणारा विराट कोहली पहिलाच भारतीय कर्णधार!
–किंग कोहलीने रचला इतिहास; सचिन-लारा सारख्या दिग्गजांनाही टाकले मागे






