आज (2 फेब्रुवारी) बे ओव्हल (Bay Oval), माऊंट मॉनगनुई (Mount Maunganui) येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा (5th & Last Match) सामना पार पडला. हा सामना भारताने 7 धावांनी (Won by 7 Runs) जिंकला. त्याचबरोबर मालिका 5-0 अशा मोठ्या फरकाने खिशात घातली.
टी20 मालिकेतील या सामन्यात अनेक विक्रम (Record) झाले. यामध्ये भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्मानेही (Rohit Sharma) एक खास विक्रम केला आहे. त्याने या सामन्यात 41 चेंडूत 60 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 3 षटकार मारले. हे त्याने न्यूझीलंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध केलेले तिसरे अर्धशतक आहे.
त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्यांच्याच मायदेशात सर्वाधिक अर्धशतके करणारा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
या यादीत रोहितपाठोपाठ भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल (KL Rahul) दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने 2 अर्धशतके केली आहेत. राहुलने ही कामगिरी याच मालिकेत केली आहे.
त्याचबरोबर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), मनीष पांडे (manish Pandey), सुरेश रैना (Suresh Raina) आणि युवराज सिंग (Yuvraj Singh) या भारतीय क्रिकेटपटूंनी न्यूझीलंडविरुद्ध न्यूझीलंडमध्ये आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये प्रत्येकी 1 अर्धशतक केले आहे.
आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध न्यूझीलंडमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणारे भारतीय खेळाडू-
3 अर्धशतके – रोहित शर्मा (8 सामने)
2 अर्धशतके – केएल राहुल (5 सामने)
1 अर्धशतक – श्रेयस अय्यर (5 सामने)
1 अर्धशतक – मनीष पांडे (5 सामने)
1 अर्धशतक – सुरेश रैना (2 सामने)
1 अर्धशतक – युवराज सिंग (2 सामने)
रोहित शर्मा एक्सप्रेस सुसाट; सचिन, कोहली, धोनीसारख्या खेळाडूंच्या यादीत सामील
वाचा👉https://t.co/oaxSprsoOs👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @ImRo45— Maha Sports (@Maha_Sports) February 2, 2020
'हिटमॅन' रोहित शर्मा 'रनमशीन' कोहलीला पडला भारी; मोडला हा मोठा विश्वविक्रम
वाचा👉https://t.co/Cu8D69KoAC👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND @ImRo45— Maha Sports (@Maha_Sports) February 2, 2020