लॉर्ड्समध्ये सुरु असलेल्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडच्या जो रूटने शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पण याच सामन्यात त्याने क्षेत्ररक्षणाद्वारे आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. रूट आता टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा फिल्डर ठरला आहे. त्याने भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविडचा विक्रम मागे टाकत हा मान पटकावला.
राहुल द्रविडने आपल्या 164 कसोटी सामन्यांमध्ये 210 झेल घेतले होते, तर रूटने करुण नायरचा अप्रतिम झेल घेत 211 झेल पूर्ण करत विक्रम आपल्या नावे केला. सध्या स्टीव्ह स्मिथ हा एकमेव खेळाडू आहे जो रूटच्या या विक्रमाच्या जवळ आहे.
चला जाणून घेऊया कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या टॉप-5 खेळाडूंबद्दल:
रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया)
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग अजूनही सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक मानला जातो. त्याने आपल्या 168 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 196 झेल घेतले आहेत.
जॅक कॅलिस / स्टीव्ह स्मिथ (दक्षिण आफ्रिका / ऑस्ट्रेलिया)
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज ऑलराउंडर जॅक कॅलिस आणि ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ यांनी दोघांनीही 200 झेल घेतले आहेत. या दोघांनाही चौथा क्रमांक मिळतो.
महेला जयवर्धने (श्रीलंका)
श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेने 149 कसोटी सामन्यांमध्ये 205 झेल घेतले आहेत. 1997 ते 2014 असा त्याचा प्रदीर्घ कसोटी करिअर होता.
राहुल द्रविड (भारत)
भारतीय क्रिकेटमधील ‘द वॉल’ म्हणून ओळखला जाणारे राहुल द्रविडने 164 कसोटी सामन्यांमध्ये 210 झेल घेतले. स्लिपमध्ये तो कायम विश्वासार्ह फील्डर म्हणून ओळखला जात असत.
जो रूट (इंग्लंड)
आता या यादीत अव्वल क्रमांकावर इंग्लंडचा जो रूट आहे. त्याने 156* कसोटी सामन्यांमध्ये 211 झेल* घेतले आहेत आणि हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.






