---Advertisement---

टीम इंडियाविरुद्ध स्टिव्ह स्मिथच्या खात्यात मोठ्या विक्रमाची नोंद भल्याभल्यांना ठरला वरचढ

On: शनिवार, नोव्हेंबर 28, 2020 4:08 PM
---Advertisement---

शुक्रवारी(२७ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने भारतीय क्रिकेट संघाला ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात ६६ धावांनी पराभूत केले. ऑस्ट्रेलियाच्या या विजयात स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथने मोठा वाटा उचलला. त्याला या सामन्यात सामनावीर पुरस्कारही बहाल करण्यात आला. याबरोबरच स्मिथने एक खास विक्रमही नोंदवला आहे.

स्मिथने या सामन्यात ६६ चेंडूत १०५ धावांची शतकी खेळी केली. त्याने या खेळीत ११ चौकार आणि ४ षटकार मारले. स्मिथचे हे वनडे कारकिर्दीतील १० वे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ३६ वे शतक होते. तसेच त्याची भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक करण्याची ११ वी वेळ होती.

त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध सर्वाधिक शतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्मिथ दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने या यादीत विवियन रिचर्ड्स, कुमार संगकारा यांची बरोबरी केली आहे. रिचर्ड्स आणि संगकारा यांनीही भारताविरुद्ध प्रत्येकी ११ शतके केली आहेत. हा पराक्रम करताना स्मिथने सनथ जयसुर्या आणि माहेला जयवर्धनेला मागे टाकले आहे. त्यांनी भारताविरुद्ध प्रत्येकी १० शतके केली आहेत.

भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या नावावर आहे. पाँटिंगने १४ शतके भारताविरुद्ध केली आहेत.

स्मिथ भारताविरुद्ध जलद वनडे शतक करणारा पाचवा फलंदाज –

स्मिथने शुक्रवारी ६२ चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले होते. त्यामुळे तो भारताविरुद्ध सर्वात जलद वनडे शतक करणारा पाचव्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर शाहिद आफ्रिदी असून त्याने सन २००५ ला कानपूर वनडेत ४५ चेंडूत शतक केले होते. तर दुसऱ्या क्रमांकावर जेम्स फॉकनर आहे. फॉकनरने सन २०१३ ला बंगळुरु वनडेत ५७ चेंडूत शतक झळकावले होते. फॉकनर पाठोपाठ एबी डिविलियर्स असून त्याने सन २०१५ ला मुंबई वनडेत ५७ चेंडूत तर सन २०१० ला अहमदाबाद वनडेत ५८ चेंडूत शतक केले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

‘विश्वचषक २०१९ मधील चुकांची पुनरावृत्ती करू नका’, टीम इंडियाच्या पराभवानंतर गौतमची ‘गंभीर’ प्रतिक्रिया

अरेरे…! भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामन्यात अवघ्या ७ धावांनी हुकला हा मोठा विक्रम

एकाच सामन्यात दोन धक्के! आयसीसीने टीम इंडियावर ठोठावला मोठा दंड

ट्रेंडिंग लेख –

भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात ‘या’ तीन कारणामुळे पराभव पहावा लागला

भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना ‘या’ ४ धुरंधरानी ठोकलेत वनडेत वेगवान शतके

आयपीएलमध्ये धावांसाठी वणवण करणारे ३ ऑस्ट्रेलियन भारताविरुद्ध पहिल्या वनडेत ‘सुपरहिट’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---