---Advertisement---

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके झळकावणारे फलंदाज, अव्वल स्थानी आहे ‘हा’ दिग्गज

On: बुधवार, जून 2, 2021 5:03 PM
---Advertisement---

नेहमी म्हटलं जातं कसोटी क्रिकेटच खरं अस्सल क्रिकेट आहे, ज्यात खेळाडूचा खऱ्या अर्थाने कस लागतो. या प्रकारात खेळतांना मोठ्या प्रमाणात त्याग आणि धैर्य या गुणांची आवश्यकता असते, त्यामुळे हा कुणीही येऊन यात महारथी होऊ शकत नाही. परंतु विराट कोहलीसारखे काही फलंदाज सुद्धा आहेत जे या कठीण प्रकारात देखील निपुण आहेत, आणि अनेक विक्रमांना त्याने गवसणी घातली आहे.
साल 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराटने आपल्या कारकिर्दीतील सातवे द्विशतक झळकावले होते आणि असा पराक्रम करणारा तो पहिला भारतीय खेळाडू होता. कोहलीची कारकीर्द बघितल्यास आपल्याला लक्षात येईल की त्याची सगळी द्विशतक ही 2015 नंतर आली आहे. तरीही कसोटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक द्विशतक लगवणाऱ्या फलंदाजांमध्ये कोहली अजूनही चौथ्या स्थानी आहे. चला तर या लेखात या यादीतील बघूया प्रथम तीन फलंदाज कोण आहेत.

३)ब्रायन लारा- वेस्ट इंडिज संघाचा महान कर्णधार ब्रायन लाराच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक व्यक्तिगत धावसंख्येचा विक्रम आहे. त्याने आपल्या सोळा वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत एकूण नऊ द्विशतके लगावली. 1993 साली पहिल्यांदा त्याने द्विशतक ठोकले व त्यानंतर 1994 साली इंग्लंडविरुद्ध 375 धावांची ताबडतोड खेळी केली. आणि नंतर पुन्हा द्विशतक करायला त्यांना पाच वर्ष लागली. पण त्यांनी 1999 ते 2003 या काळात एकूण चार द्विशतके झळकावली. 2004 साली इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या त्याचा नाबाद 400 धावांचा विक्रम आजही अबाधित आहे .

२)कुमार संगकारा- श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू माजी यष्टीरक्षक कुमार संगकारा आशियाई फलंदाजांमध्ये सर्वाधिक द्विशतकवीरांच्या यादीत अव्वल स्थानावर विराजमान आहे. लाहोर मध्ये त्याने आपल्या कारकीर्दीतील पहिलं द्विशतक केलं. आणि नंतर झिम्बाब्वेविरुद्ध 270 धावांची शानदार खेळी केली होती. संगकाराने मग लवकरच आपल्या घरच्या मैदानावर पहिलं द्विशतक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 287 धावा झळकवत साकारलं. 2007 मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळतांना या महान खेळाडूने फक्त आठ दिवसाच्या अंतरावर दोन द्विशतके लगावलीत. आणि 2010 मध्ये भारताविरुद्ध खेळतांना त्याने आपल्या कारकिर्दीतील सातवे द्विशतक केलं. संगकाराने 2014 साली बांगलादेश विरुद्ध आपला सर्वोच्च व्यक्तिगत धावसंख्या (319) उभी केली, आणि नंतर परत पाकिस्तानविरुद्ध द्विशतक व त्याचं शेवटचं द्विशतक 2015 साली न्यूझीलंड संघाविरुद्ध होतं.

१)सर डॉन ब्रॅडमन- कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतकांचा विक्रम डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. त्यांनी फक्त 52 कसोटी सामन्यात तब्बल 12 द्विशतक झळकावली आहे. त्यांनी 1930 सालच्या एशेस मालिकेत इंग्लंडविरुद्ध 3 द्विशतक केली होतं. आणि वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्याच कसोटीत 223 धावांची शानदार खेळी केली होती.
त्यांनंतर आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर 2 द्विशतकानंतर 1934च्या एशेस मालिकेत चौथ्या आणि पाचव्या सामन्यात आपल्या कारकिर्दीतील सातवे आणि आठवे द्विशतक ठोकले. इंग्लंड हा सर डॉन ब्रॅडमन यांचा आवडता विरोधी संघ होता, कारण त्यांनी त्या संघाविरुद्ध तीन द्विशतके लगावली. 1948 साली भारतीय संघाविरुद्ध त्यांनी आपल्या कारकिर्दीतील 12 द्विशतके झळकावले. त्यांच्या नावावर अजूनही सर्वाधिक द्विशतकांचा विक्रम आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

‘विश्वविजेता कर्णधार मॉर्गनमध्ये नाहीत नेतृत्वगुण, तर रणनिती आखण्यात धोनी श्रेष्ठ’, पाकिस्तानी क्रिकेटपटूचा मोठा दावा

व्वा! फिरकीच्या तालावर फलंदाजांना नाचवणारा राशिद खान झाला सिंगर, व्हिडिओ भन्नाट व्हायरल

ज्या मुंबईतून क्रिकेटचे संस्कार झाले, त्याच मुंबई संघाचा ‘महागुरु’ बनलेल्या अमोल मुजुमदारचा प्रवास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---