आयपीएल 2023चा मिनी लिलाव कोची येथे शुक्रवारी (दि. 23 डिसेंबर) पार पडला. या लिलावात अनेक खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांचा पाऊस पडला. काही खेळाडूंना आयपीएल लिलावात खेळण्याची खूपच इच्छा होती, पण ते अनसोल्ड राहिले. मात्र, काही युवा खेळाडू होते, ज्यांच्यावर संघांनी सर्वाधिक बोली लावत त्यांना आपल्या ताफ्यात सामील केले. या मिनी लिलावातून आयपीएलला आतापर्यंतचे 4 सर्वाधिक महागडे खेळाडू मिळाले. चला तर जाणून घेऊया कोण आहेत आतापर्यंतचे सर्वात महागडे खेळाडू…
आयपीएल 2023 मिनी लिलावात (IPL 2023 Mini Auction) विस्फोटक खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेण्यासाठी अनेक संघांमध्ये शर्यत लागली होती. यामध्ये पंजाब किंग्स संघाने सर्वात मोठी बोली लावत इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन (Sam Curran) याला 18.50 कोटी रुपयात आपल्या ताफ्यात घेतले. अशाप्रकारे सॅम करन हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याच्यानंतर मुंबई इंडियन्स संघाने कॅमरून ग्रीन (Cameron Green) याला तब्बल 17.50 कोटी रुपयात आपल्या ताफ्यात घेतले. यासोबतच कॅमरून आयपीएल इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू ठरला.
https://twitter.com/IPL/status/1606227823877922817
https://twitter.com/IPL/status/1606234448663441409
त्याच्यापाठोपाठ याच लिलावात बेन स्टोक्स (Ben Stokes) याच्यावरही मोठी बोली लागली. त्याला चेन्नई सुपर किंग्स संघाने आपल्या ताफ्यात सामील केले. चेन्नईने त्याला 16.25 कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात सामील केले. स्टोक्स ख्रिस मॉरिससह (16.25 कोटी) संयुक्तरीत्या तिसऱ्या क्रमांकाचा आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला. याव्यतिरिक्त निकोलस पूरन (Nicholas Pooran) याच्यावरही पैशांचा पाऊस पडला. त्याला लखनऊ सुपर जायंट्स संघाने 16 कोटींच्या मोठ्या किंमतीत ताफ्यात सामील केले. अशाप्रकारे तो युवराज सिंग (16 कोटी) याच्यासोबत आयपीएल इतिहासातील संयुक्तरीत्या चौथ्या क्रमांकाचा महागडा खेळाडू ठरला. (Most Expensive Players in the ipl Auction sam curran at the top)
https://twitter.com/IPL/status/1606234538916601859
https://twitter.com/IPL/status/1606239408557916160
आयपीएल इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू
18.50 कोटी- सॅम करन (पंजाब किंग्स)
17.5 कोटी- कॅमरून ग्रीन (मुंबई इंडियन्स)
16.25 कोटी- बेन स्टोक्स (चेन्नई सुपर किंग्स)
16.25 कोटी- ख्रिस मॉरिस (राजस्थान रॉयल्स)
16 कोटी- युवराज सिंग (दिल्ली कॅपिटल्स)
16 कोटी- निकोलस पूरन (लखनऊ सुपर जायंट्स)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न भूतो! 18 कोटी 50 लाखांची बोली मिळवून सॅम करनने घडवला इतिहास; या संघाचा झाला भाग
झिम्बाब्वेचा अष्टपैलू आयपीएलमध्ये घालणार धुमाकूळ, मिनी लिलावात पंजाबने केली ‘एवढ्या’ लाखांची उधळण






