ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या पुरूषांच्या आठव्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup) काही संघ प्रथमच सुपर 12मध्ये खेळत आहेत. त्यातील काहींनी तर चॅम्पियन संघांनाच बाहेर काढले. यामध्ये अनेकांनी वैयक्तिक तर काही संघांनी नवे विक्रम रचले आहेत. ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या पाहिल्या तर फलंदाजांसाठी आव्हानात्मक आणि गोलंदाजांसाठी पूरक ठरताना दिसल्या. ऑस्ट्रेलियासाठी हे घरचेच मैदान असल्याने त्यांच्या फलंदाजांनी अनेक धावा काढत मोठे विक्रम आपल्या नावे केले आहे, मात्र एका विक्रमाला भारताच्या स्फोटक फलंदाजाने धक्का दिला आहे.
भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याची फलंदाजी जगप्रसिद्ध आहे. तसेच त्याचे विक्रम मोडण्याचे कौशल्यही. आशिया चषकातील त्याचा फॉर्म टी20 विश्वचषकात सुरू आहे. त्याने सुपर 12च्या पहिल्या दोन्ही सामन्यात दोन अर्धशतके झळकावली. यामुळे त्याची ऑस्ट्रेलियात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एकूण 7 अर्धशतके झाली आहेत. तो एक विक्रमच झाला असून त्याने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) आणि कर्णधार ऍरॉन फिंच यांची बरोबरी केली आहे, मात्र याचबरोबर तो ऑस्ट्रेलियात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतके करणारा एकमेव फलंदाज ठरला आहे.
विराटने 12 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. वॉर्नरने ऑस्ट्रेलियात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 7 अर्धशतके करण्यासाठी 29 डाव आणि फिंचने 42 डाव घेतले. यावरून विराट हाच ऑस्ट्रेलियामध्ये सर्वात जलद आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये अर्धशतके करणारा फलंदाज ठरला आहे.
विराटची आंतरराष्ट्रीय टी20 सर्वोत्तम दुसऱ्या क्रमांकाची सरासरी ऑस्ट्रेलियात
विराटने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा भारतानंतर ऑस्ट्रेलियात केल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एकूण 3856 धावा केल्या आहेत. त्यातील 595 धावा ऑस्ट्रेलियात केल्या आहेत. या धावा त्याने 13 सामन्यांतील 12 डावांमध्ये 85.00च्या सरासरीने खेळताना केल्या आहेत. ऑस्ट्रेलियात त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या नाबाद 90 आहे. ही खेळी त्याने 2016मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच ऍटलेडमध्ये केली होती. त्याची आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम सरासरी बांगलादेशमध्ये (94.40) आहे.
ऑस्ट्रेलियात आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक अर्धशतके
विराट कोहली – 7 (12 डाव)
डेविड वॉर्नर – 7 (29 डाव)
ऍरॉन फिंच – 7 (42 डाव)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाद पेटला! ‘मिस्टर बीन’ने वादाला दिली फोडणी, झिम्बाब्वेच्या राष्ट्रपतींना भिडले पाकिस्तानी पंतप्रधान
नियमांना फाट्यावर मारत जिंकायला निघालेला पाकिस्तान, पण झिम्बाब्वेच्या सिकंदरने हाणून पाडला डाव