आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या (International Cricket) तिन्ही फाॅरमॅटमध्ये अनेक दिग्गज फलंदाजांच्या अथवा दिग्गज गोलंदाजांच्या नावावर अनेक रेकाॅर्ड्स आहेत. क्रिकेटच्या कोणत्यातरी फाॅरमॅटमध्ये एखादा खेळाडू असे रेकाॅर्ड बनवून ठेवतो. जो रेकाॅर्ड कित्येक वर्ष कोणी मोडत नाही. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक हॅट्रिक घेणाऱ्या दिग्गज गोलंदाजांबद्दल जाणून घेऊया. या यादीमध्ये भारताच्या एका स्टार खेळाडूचा देखील समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात अनेक महान गोलंदाज होऊन गेले. मात्र, महान गोलंदाजांलाही एकदिवसीय क्रिकेटमध्ये हॅट्रिक मिळवता आली नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये जर एखाद्या गोलंदाजानं हॅट्रिक घेतली, तर त्यापैकी बहुतेकांनी केवळ एकदाच घेतली.
लसिथ मलिंगा- श्रीलंकेचा माजी दिग्गज खेळाडू लसिथ मलिंगा (Lasith Malinga) हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक हॅट्रिक घेणारा गोलंदाज आहे. मलिंगानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये धारदार गोलंदाजी करत एकूण 3 वेळा हॅट्रिक घेतली आहे. मलिंगानं 226 एकदिवसीय सामन्यात 28.87च्या सरासरीनं 338 विकेट्स घेतल्या आहेत. मलिंगा हा महान गोलंदाजांपैकी एक आहे.
कुलदीप यादव- एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भारताचा स्टार फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचाही समावेश आहे. कुलदी यादवनं (Kuldeep Yadav) एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 2 वेळा हॅट्रिक घेतली आहे.
ट्रेंट बोल्ट- न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टनं (Trent Boult) एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकापेक्षा जास्त वेळा हॅट्रिक घेण्याचा रेकाॅर्ड केला आहे. बोल्टनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2 वेळा हॅट्रिक घेतली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये बोल्टनं 114 सामन्यात 211 विकेट्स घेतल्या आहेत.
वसीम अक्रम- माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम (Wasim Akram) देखील या यादीत समाविष्ट आहे. अनुभवी वसीम अक्रमनंही एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2 वेळा हॅट्रिक घेण्याचा रेकाॅर्ड केला आहे. अक्रमनं त्याच्या एकदिवसीय कारकीर्दीमध्ये 356 सामने खेळले आणि 502 विकेट्स घेतल्या.
चामिंडा वास- श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज चामिंडा वासनंही (Chaminda Vaas) एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2 वेळा हॅट्रिक घेतली आहे. वासनं त्याच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकीर्दीत 322 सामने खेळले आणि 27.53च्या सरासरीनं 400 विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
ऐकावं ते नवलच! स्वत:च्याच मुलाविरुद्ध मैदानावर उतरला दिग्गज क्रिकेटपटू
विराट तर दुरच, बाबर आझमची तुलना शुबमन गिलशी पण होणार नाही; एकदा आकडेवारी पाहाचं
पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी कोणी जिंकलं पहिलं सुवर्णपदक? वाचा सविस्तर