आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एखाद्या देशात चांगली कामगिरी करणे तशी कठीण गोष्ट. त्याचबरोबर जास्त सामने खेळायला मिळणे त्याहुन कठीण गोष्ट. कारण तुम्ही एखाद्या देशाचे बरेच दौरे करता तेव्हाच तुम्हाला तेथे अनेक सामने खेळायला मिळतात.
आणि अनेक दौरे करण्यासाठी करावी लागते ती सातत्यपुर्ण कामगिरी. भारतात १३९२ परदेशी खेळाडूंनी कोणत्या ना कोणत्या प्रकारचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. यातील केवळ दोन खेळाडूंना ५० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामंने भारतात खेळता आले. तर ११ खेळाडूंनी ४० किंवा अधिक आंतरराष्ट्रीय सामने भारतात खेळले आहेत. हे सगळेच सामने ते भारतात भारताविरुद्ध खेळले असे अजिबात नाही.
४० किंवा अधिक सामने खेळणाऱ्या यातील कार्ल हुपर व माहेला जयवर्धने सोडून कुणालाही समाधानकारक कामगिरी फलंदाजीत करता आली नाही. Most international matches as a player in India.
भारतात सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू
६१- रिकी पाॅटींग, धावा- २४७४
५०- अर्जुन रणतुंगा, धावा- १५४४
४९- सनथ जयसुर्या, धावा- १२१८
४८- स्टिव वाॅ, धावा- १४३९
४७- अरविंद डिसिल्वा, धावा- १८४१
४७- मार्लन सॅम्युअल, धावा- १५५३
ट्रेंडिंग घडामोडी-
–भारताचे दिग्गज क्रिकेटपटू व त्यांनी सुरु केलेली अलिशान हाॅटेल्स
-वनडेत पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे ५ महान गोलंदाज
-जो विक्रम भारताच्या नावावर हवा होता तो आहे पाकिस्तानच्या नावावर
-भारतीय संघातील या खेळाडूमुळेच केदार खेळू शकला एवढे वनडे सामने