मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंगलोर यांच्यातील सामना सोमवारी पार पडला. यात आयपीएल सामन्यात एबी डिविलियर्सने शानदार विक्रम करत अनेक जुने विक्रम मोडीत काढले. त्यात कमी चेंडूत अर्धशतक करण्याचा एक खास विक्रम त्याने दुबईच्या स्टेडियमवर केला.
रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. यात फलंदाजीला ऍरॉन फिंच व विराट कोहली बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या एबी डिविलिर्यने या सामन्यात शानदार फलंदाजी करताना २४ चेंडूत ५५ धावा केल्या. यात त्याने धमाकेदार ४ चौकार व ४ षटकार मारले.
त्याचे हे आयपीएलमधील ३५वे अर्धशतक होते. या ३५ अर्धशतकांपैकी ६ अर्धशतके एबीने २५ पेक्षा कमी चेंडूत केली आहेत. याचमुळे त्याने माजी महान फलंदाज विरेंद्र सेहवागच्या एका विक्रमाची बरोबरी केली आहे. सेहवागनेही आयपीएल कारकिर्दीत ६ वेळा २५ पेक्षा कमी चेंडूत अर्धशतके केली आहेत.
https://twitter.com/RezaAhm91905564/status/1310614326030393352
डिविलियर्सने गेल्या २६ आयपीएल डावात तब्बल १३ शतके करण्याचा कारनामा केला आहे. यावरुनच तो या स्पर्धेत किती जबरदस्त खेळतो, याचा अंदाज येतो.
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा २५ किंवा कमी चेंडूत अर्धशतक करणारे फलंदाज
६ वेळा- एबी डिविलियर्स
६ वेळा- विरेंद्र सेहवाग
५ वेळा- डेविड वॉर्नर
५ वेळा- कायरन पोलार्ड
४ वेळा- केएल राहुल
४ वेळा- युसूफ पठाण
४ वेळा- ख्रिस गेल