पोर्ट ऑफ स्पेन। रविवारी(11 ऑगस्ट) भारताने वेस्ट इंडीज विरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात डकवर्थ लूईस नियमानुसार 59 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीने शतकी खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
विराटने या सामन्यात 14 चौकार आणि 1 षटकारासह 125 चेंडूत 120 धावांची खेळी केली. हे विराटचे कर्णधार म्हणून वनडेतील 20 वे शतक होते.
त्यामुळे भारतीय फलंदाजाने एकाच कर्णधाराच्या नेतृत्त्वाखाली सर्वाधिक वनडे शतके करण्याचा विक्रम विराटच्या नावावर झाला आहे. विशेष म्हणजे विराटने स्वत:च्याच नेतृत्वाखाली हा पराक्रम केला आहे.
त्याने हा विक्रम करताना एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली केलेल्या त्याच्या 19 शतकांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
एकाच कर्णधाराच्या नेतृत्त्वाखाली सर्वाधिक वनडे शतके करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर मोहम्मद अझरुद्दीन आणि सचिन तेंडुलकर ही कर्णधार-खेळाडूची जोडी आहे. अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली सचिनने 18 शतके केली आहेत.
भारतीय फलंदाजाने एकाच कर्णधाराच्या नेतृत्त्वाखाली सर्वाधिक वनडे शतके करण्याचा विक्रम –
20 – विराट कोहली, कर्णधार- विराट कोहली, खेळाडू
19 – एमएस धोनी कर्णधार, विराट कोहली, खेळाडू
18 – मोहम्मद अझरुद्दीन, कर्णधार, सचिन तेंडूलकर, खेळाडू
16 – विराट कोहली, कर्णधार, रोहित शर्मा, खेळाडू
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–११ धावांवर बाद झाला ख्रिस गेल पण केला हा मोठा विश्वविक्रम
–विराट कोहली हा मोठा पराक्रम करत रोहित शर्माला ठरला सरस!
–किंग कोहलीने गांगुलीच्या या ‘दादा’ विक्रमाला टाकले मागे