इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात कालपासून(12 सप्टेंबर) ऍशेस मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू मिशेल मार्शने पहिल्या डावात 5 विकेट्स घेत इंग्लंडचा डाव 294 धावांवर संपुष्टात आणण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.
मार्शने या सामन्यातून ऑस्ट्रेलिया संघात जवळ जवळ 9 महिन्यांनी पुनरागमन केले आहे. त्याने पुनरागमन करताना काल पहिल्या दिवशी 4 विकेट्स तर आज 1 विकेट अशा मिळून पहिल्या डावात 5 विकेट्स घेत शानदार कामगिरी केली.
तो काल पहिल्या दिवसाच्या खेळानंतर पत्रकार परिषदेसाठी आला होता. त्यावेळी त्याला त्याच्याबद्दल ऑस्ट्रिलयन चाहत्यांच्या असणाऱ्या मतांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना हसून मार्श म्हणाला, ‘हो, अनेक ऑस्ट्रेलियन माझा तिरस्कार करतात.’
तो पुढे म्हणाला, ‘ऑस्ट्रेलियन्स खूप उत्कट आहेत आणि त्यांच्या क्रिकेटवर ते खूप प्रेम करतात. त्यांची इच्छा असते की खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी.’
‘यात शंका नाही की कसोटीमध्ये मला अनेक संधी मिळाल्या आणि मी त्याचा फायदा घेऊ शकलो नाही. पण मी सातत्याने पुनरागमन करत असल्याने मला आशा आहे की ते माझा आदर करतील. मला ऑस्ट्रेलियासाठी खेळायला आवडते. मला ऑस्ट्रेलियाची ग्रिन बॅगी कॅप आवडते. मी प्रयत्न करत राहील आणि आशा आहे की एक दिवस त्यांचे मन जिंकेल.’
तसेच मागील काही महिन्यातील त्याच्या खराब फॉर्मचे कारण सांगताना तो म्हणाला, ‘मी धावा करु शकत नव्हतो. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सातत्याने धावा कराव्या लागतात.’
‘मागील वर्षी माझ्या वैयक्तिक आयुष्यात काही समस्या आल्या होत्या. माझ्या जवळच्या मित्राने आत्महत्या केली होती. त्याचा परिणाम माझ्या क्रिकेटवर झाला. मी या घटनेला चांगल्याप्रकारे सांभाळू शकलो नाही. पण मी आता संघात येऊ इच्छित होतो. मला संघात सकारात्मकता आणायची होती आणि मला वाटते मी ते केले. मी संधीची वाट पाहत होतो.’
After a career-best bowling display on day one, this is a class response from Mitch Marsh when asked about the 'outside noise' that has surrounded his Test career #Ashes pic.twitter.com/4dOtCtTltm
— cricket.com.au (@cricketcomau) September 12, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–ज्या मैदानात १८ वर्षांपूर्वी विराटने भावाबरोबर सामना पाहिला त्याच मैदानात झाला त्याचा मोठा सन्मान
–दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहित शर्मा या सामन्यात असणार कर्णधार
–प्रो कबड्डीत अशी कामगिरी करणारा गिरिश एर्नाक पहिला महाराष्ट्रीयन खेळाडू






