Loading...

कमी सामन्यात कर्णधार राहुन कोहली विक्रमांत धोनी- गांगुलीच्या पुढे

मेलबर्न। भारताने आज (३० डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात १३७ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयामुळे भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

याबरोबरच हा विजय भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठीही खास ठरला आहे. त्याने भारताचे नेतृत्व करताना परदेशात कसोटीतील ११ वा विजय मिळवला आहे. त्यामुळे त्याने कसोटीमध्ये परदेशात सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत सौरव गांगुलीच्या ११ विजयांची बरोबरी करत अव्वल स्थान मिळवले आहे.

विराटने आत्तापर्यंत भारताचे ४५ कसोटी सामन्यात नेतृत्व केले आहे. त्यातील २४ सामने त्याने परदेशात खेळले आहेत. या २४ सामन्यांपैकी ११ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.

याआधी परदेशात कसोटी क्रिकेटमध्ये ११ विजय मिळवण्याचा पराक्रम भारताचा माजी कर्णधार गांगुलीने केला होता. त्याने भारताचे ४९ कसोटी सामन्यात नेतृत्व केले आहे. यातील २८ सामने परदेशात खेळले आहेत.

विराटने भारताचे नेतृत्व करताना या वर्षी दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये विजय मिळवले आहेत.

Loading...

परदेशात सर्वाधिक कसोटी विजय मिळवणारे भारतीय कर्णधार – 

११ विजय* – विराट कोहली

११ विजय – सौरव गांगुली

६ विजय – एमएस धोनी

५ विजय – राहुल द्रविड

३ विजय – बिशनसिंग बेदी

महत्त्वाच्या बातम्या:

बुमराह पॅटर्न लईच वाईट, आफ्रिका, इंग्लड आणि आता ऑस्ट्रेलिया, कुणालाच समजला नाही

Loading...

बुमराह एक, पराक्रम अनेक- भारताच्या या शिलेदाराचे भीमपराक्रम पहाच

विकेट्स घेतल्या बुमरहाने, धावा केल्या पुजाराने, विक्रम झाला इशांतच्या नावावर

 

You might also like
Loading...