आशिया कपची (Asia Cup 2025) सुरुवात लवकरच होणार आहे. ही स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरू होऊन 28 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. यंदा आशिया कप 2025 टी20 फॉरमॅटमध्ये खेळला जाणार आहे. याआधी 2016 आणि 2022 मध्येही ही स्पर्धा टी20 स्वरूपात झाली होती. आशिया कपसाठी सर्व 8 संघांनी आपापल्या टीम जाहीर केल्या आहेत. या स्पर्धेत टी20 क्रिकेटमधील अनेक दिग्गज खेळाडू मैदानात उतरणार आहेत. चला तर जाणून घेऊया, टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक ‘प्लेअर ऑफ द मॅच’ जिंकणारे खेळाडू कोण आहेत.
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा (Team india) दबदबा कायम आहे. भारत सध्या आयसीसी टी20 रँकिंगमध्ये नंबर वनवर आहे. भारतीय खेळाडूंची कामगिरी टी20मध्ये सातत्याने उत्तम राहिली आहे. अनेक वेळा भारतीयांना सामन्यानंतर ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्कारांच्या यादीत टॉप-5 मध्ये दोन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.
विरनदीप सिंग (मलेशिया)
मलेशियाचा क्रिकेटपटू विरनदीप सिंग (Virandeep Singh) 102 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 22 वेळा ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला आहे. सर्वाधिक वेळा हा किताब जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर आहे.
सिकंदर रझा (झिम्बाब्वे)
झिम्बाब्वेचा खेळाडू सिकंदर रझा (Siqnder Rejha) 2013 पासून टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. त्याने 110 सामन्यांत 17 वेळा ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार पटकावला आहे. या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे.
सूर्यकुमार यादव (भारत)
भारताचा टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. 2021 मध्ये टी20 आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू केल्यापासून सूर्या आतापर्यंत 83 सामने खेळला असून त्याने 16 वेळा ‘प्लेअर ऑफ द मॅच’ जिंकले आहेत. आशिया कप 2025 मध्ये तो टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे.
विराट कोहली (भारत)
टी20 क्रिकेटमधून निवृत्त झालेला विराट कोहली (Virat Kohli) या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. 2010 ते 2025 या काळात त्याने 125 टी20 सामने खेळले आणि 16 वेळा ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकला आहे.
मोहम्मद नबी (अफगाणिस्तान)
अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी (Mohmmed Nabi) 135 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला असून 14 वेळा ‘प्लेअर ऑफ द मॅच’ निवडला गेला आहे. त्याला आशिया कप 2025 साठी अफगाणिस्तानच्या संघात पुन्हा संधी देण्यात आली आहे.






