---Advertisement---

नाद करायचा नाय! चाहर 2018पासून गाजवतोय आयपीएलचा पॉवरप्ले, बोल्ट अन् शमीलाही पछाडत रचला विक्रम

Deepak-Chahar
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स संघात 55वा सामना खेळला जात आहे. बुधवारी (दि. 10 मे) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर याने जबरदस्त कामगिरी करत खास विक्रम नावावर नोंदवला. चाहर याने 2018पासून आयपीएलमध्ये खेळताना कौतुकास्पद कामगिरी केली आहे. काय आहे त्याचा विक्रम चला जाणून घेऊयात…

चेन्नई संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी चेन्नईने निर्धारित 20 षटकात 167 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी कर्णधार डेविड वॉर्नर (David Warner) आणि फिलिप सॉल्ट (Philip Salt) मैदानात उतरले होते. यावेळी चेन्नईकडून पहिले षटक दीपक चाहर (Deepak Chahar) टाकत होता. चाहरच्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याने वॉर्नरला अजिंक्य रहाणे याच्या हातून शून्य धावेवर झेलबाद केले.

https://twitter.com/IPL/status/1656331335722737665

यानंतर चाहरने डावातील तिसरे षटक टाकण्यासाठी आल्यावर फिलिप सॉल्ट यालाही वैयक्तिक 17 धावसंख्येवर असताना तिसऱ्या चेंडूवर अंबाती रायुडू याच्या हातून झेलबाद केले. या विकेट्स काढताच चाहरच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली.

https://twitter.com/IPL/status/1656334972154961921

दीपक चाहरचा विक्रम
दीपक चाहर हा 2018पासून पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा अव्वल गोलंदाज ठरला. चाहरने 2018पासून आतापर्यंत पॉवरप्लेमध्ये 48 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्यानंतर या यादीत दुसऱ्या स्थानी ट्रेंट बोल्ट आहे. त्याने 45 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, तिसऱ्या स्थानी मोहम्मद शमी असून त्याने 38, तर संयुक्तरीत्या चौथ्या स्थानावर असलेल्या मोहम्मद सिराज आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी 27 विकेट्स घेतल्या आहेत.

सन 2018पासून पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
48* – दीपक चाहर

45 – ट्रेंट बोल्ट
38 – मोहम्मद शमी
27 – मोहम्मद सिराज
27 – उमेश यादव

चाहरच्या आयपीएल 2023मधील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत 6 सामने खेळताना फक्त 4 विकेट्स घेतल्या आहेत. संघाला चाहरने दिल्लीविरुद्ध ज्याप्रकारे विकेट्स घेतल्या आहेत, तशाच विकेट्स पुढील सामन्यांमध्येही घेण्याची अपेक्षा असेल. (Most Powerplay Wickets Since 2018 IPL see list)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीकाकारांना विराटचे सडेतोड प्रत्युत्तर; सांगूनच टाकले, कुणाशी आहे त्याची लढाई
सीएसकेच्या ‘या’ खेळाडूचा दिल्लीविरुद्ध भीमपराक्रम! बनला 200वा IPL सामना खेळणारा फक्त 9वा खेळाडू

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---