ब्रिस्बेन | भारत विरुद्ध आॅस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या टी२० सामन्यात शिखर धवनने आज टी२० इतिहासातील सर्वात मोठा विक्रम केला. त्याने २०१८मध्ये आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.
एवढ्यावरच न थांबता आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये एकाच कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विराट कोहलीचा विक्रमही मोडला आहे.
शिखर धवनने यावर्षी १६ सामन्यांत ४०.५०च्या सरासरीने ६३६ धावा केल्या आहेत. यापुर्वी विराटने २०१६मध्ये १५ सामन्यांत १०६.८३च्या सरासरीने ६४१ धावा केल्या होत्या.
एकाच वर्षांत टी२०मध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू-
६४८- शिखर धवन, २०१८
६४१- विराट कोहली, २०१६
५७६- फकर झमान, २०१८
५६३- बाबर आझम, २०१८
५६७- रोहित शर्मा, २०१८
महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा-
–किंग कोहलीचं मैदानात जंगी स्वागत, पहा व्हिडीओ
–पावसाच्या व्यत्ययानंतर टीम इंडियासमोर १७४ धावांचे आव्हान
–टी२०मध्ये अशी वेळ कोणत्याही गोलंदाजावर येऊ नये
–११२९ खेळाडूंना न जमलेली गोष्ट भारताच्या कुलदीप यादवने आज करुन दाखवली
-पाकिस्तावरील विजयानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंचा पंजाबी भांगडा, पहा व्हिडीओ