मंगळवार (२३ सप्टेंबर) या दिवशी यूएईतील अबू धाबी शहरात आयपीएलच्या तेराव्या हंगामातील पाचवा सामना खेळला गेला. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झालेल्या या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने एक शानदार विक्रम त्याच्या नावावर केला आहे.
रोहितनंतर आयपीएलमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत डेव्हिड वॉर्नरचा दूसरा क्रमांक लागतो. त्याने कोलकाता संघाविरुद्ध आतापर्यंत ८२९ धावा केल्या आहेत. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ८२५ धावा केल्या आहेत.
तसेच, वॉर्नर किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या ८१९ धावांसह या यादीत पुन्हा चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे. तर ‘मिस्ट आयपीएल’ सुरेश रैनाने कोलकाता आणि मुंबई या दोन्ही संघांविरुद्ध ८१८ धावा कुटल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-वेळ लागला! परंतू धोनीच्या विक्रमाची कार्तिकने केली बरोबरी
-१५ कोटींना खरेदी केलेल्या खेळाडूने पहिल्याच षटकात दिल्या १५ धावा
-मैदानावरील ‘त्या’ घटनेमुळे साक्षी धोनीचा पारा चढला, सोशल मीडियावरुन केली टीका
ट्रेंडिंग लेख-
-फक्त ९० धावा आणि मुंबईचा कर्णधार रोहित घालणार ‘या’ शानदार विक्रमाला गवसणी
-मुंबई-कोलकाता सामन्यामध्ये रोहित, रसलसह ‘या’ खेळाडूंना आहे मोठे विक्रम करण्याची संधी
-दे घुमा के! भारतीय फलंदाज गाजवतायेत आयपीएलचा १३ वा हंगाम