---Advertisement---

१५ कोटींना खरेदी केलेल्या खेळाडूने पहिल्याच षटकात दिल्या १५ धावा

On: बुधवार, सप्टेंबर 23, 2020 9:42 PM
---Advertisement---

आज (२३ सप्टेंबर) अबु धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर आयपीएल २०२०चा पाचवा सामना चालू आहे. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळला जात आहे. मुंबई संघाचा या हंगामातील हा दूसरा सामना आहे, तर कोलकाता संंघ आज पहिला सामना खेळताना दिसेल. या सामन्यात केकेआर संघाचा कर्णधार दिनेश कार्तिकने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि मुंबईला फलंदाजीचे आमंत्रण दिले.

या सामन्यात प्रथम फलंदाजीस उतरलेल्या मुंबई संघाकडून सलामीला फलंदाजी करण्यासाठी रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक हे फलंदाज उतरले होते. यादरम्यान दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर डी कॉक पव्हेलियनला परतला. पुढे सूर्यकुमार यादव फलंदाजीस आला. त्याने आणि रोहितने संघाचा डाव सांंभाळला. यादरम्यान केकेआरकडून चौथे षटक टाकण्यासाठी आलेला वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने आयपीएलमधील आपल्या पहिल्याच षटकात एकूण १५ धावा दिल्या. रोहितने कमिन्सच्या गोलंदाजीवर २ षटकार ठोकले.

त्यानंतर कमिन्सला थेट १५ वे षटक टाकण्यासाठी पाठविले. इथेही कमिन्सच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी करण्यात आली. यावेळीही त्याने १५ धावा दिल्या.

त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्याबद्दल चर्चा केली जात आहेत.

विशेष म्हणजे कमिन्सला केकेआर संघाने सर्वाधिक १५.५ कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात सामील केले होते.

त्याने आतापर्यंत आयपीएलचे १७ सामने खेळले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-वॉर्नरच्या हैदराबादला मोठा झटका, मॅचविनर खेळाडू पडला आयपीएल बाहेर

-जे धोनीला जमलं नाही, ते संजू सॅमसनने करुन दाखवलं

-पाहा तर स्मिथ काय म्हणतोय, धोनी- फाफने शेवटच्या षटकात चांगले शॉट्स ठोकले, पण…

ट्रेंडिंग लेख-

-हॉटस्पॉट आणि स्निकोमीटर; नक्की भानगड काय आहे भाऊ ?

-१३ वर्षांपुर्वी टीम इंडियाच्या युवराजाने केले होते ‘ऑस्ट्रेलिया’ संस्थान खालसा

-चेन्नई-राजस्थान सामन्यात बनले मोठे विक्रम, संजू सॅमसनच्या नावावर झाली ‘एवढ्या’ विक्रमांची नोंद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---