---Advertisement---

वर्ल्डकप स्पेशल: World Cupमध्ये सर्वाधिक धावा करणारे Top 10 कर्णधार; यादीत फक्त दोनच भारतीय

Kane-Williamson-And-Aaron-Finch-And-AB-De-Villiers
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा घाट 5 ऑक्टोबरपासून घातला जाणार आहे. या विश्वचषकात अनेक युवा खेळाडू पहिल्यांदाच खेळताना दिसणार आहेत. या स्पर्धेत अनेक विक्रम रचले जातील, मोडले जातील. मात्र, विश्वचषक स्पर्धेत कर्णधार म्हणून कोणत्या खेळाडूने सर्वाधिक धावा केल्या आहेत, माहितीये का? विशेष म्हणजे, अव्वल 10 खेळाडूंच्या या यादीत 2 भारतीय कर्णधारांच्या नावाचाही समावेश आहे. चला तर, जाणून घेऊयात…

केन विलियम्सन यशस्वी कर्णधार
वनडे विश्वचषक (World Cup) स्पर्धेत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वलस्थानी न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विलियम्सन (Kane Williamson) आहे. विलियम्सन याने विश्वचषक 2019 स्पर्धेत कर्णधार म्हणून 10 सामने खेळले. त्यातील 9 डावात फलंदाजी करताना 82.57च्या सरासरीने त्याने 578 धावा केल्या होत्या. यात 2 शतकांचाही समावेश होता. विलियम्सन पाठोपाठ या यादीत दुसऱ्या स्थानी श्रीलंकेचा माजी खेळाडू माहेला जयवर्धने (Mahela Jayawardene) आहे. त्याने 2007च्या विश्वषकात 548 धावांचा पाऊस पाडला होता.

यादीत तिसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा यशस्वी माजी कर्णधार रिकी पाँटिंग (Ricky Ponting) असून त्यानेही 2007च्या विश्वचषकातच 539 धावांचा पाऊस पाडला होता. याव्यतिरिक्त यादीत चौथ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ऍरॉन फिंच (Aaron Finch) आहे. त्याने 2019च्या विश्वचषकात 507 धावा केल्या होत्या. तसेच, दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज एबी डिविलियर्स (AB De Villiers) यादीत पाचव्या स्थानी असून त्याने कर्णधार म्हणून 2015च्या विश्वचषकात 482 धावा केल्या होत्या.

दोन भारतीय कोण?
भारतीय संघाचा दिग्गज कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) यादीत सहाव्या स्थानी आहे. त्याने 2003च्या विश्वचषकात 465 धावा कुटल्या होत्या. गांगुलीसोबत संयुक्तरीत्या सहाव्या स्थानी श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा (Kumar Sangakkara) असून त्याने 2011च्या विश्वचषकात 465 केल्या होत्या. यादीत सातव्या स्थानी न्यूझीलंडचा माजी कर्णधार मार्टिन क्रो (Marin Crowe)  असून त्याने 1992च्या विश्वचषकात 456 धावा केल्या होत्या. याव्यतिरिक्त आठव्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज ग्रीम स्मिथ (Graeme Smith) असून त्याने 2007च्या विश्वचषकात 443 धावा केल्या होत्या. तसेच, यादीत नवव्या स्थानी भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) असून त्याने 2019च्या विश्वचषकात 443 धावा केल्या होत्या. विराटनंतर यादीत दहावा क्रमांक पुन्हा पाँटिंगचा लागतो. त्याने 2003च्या विश्वचषकात कर्णधार म्हणून 415 धावा केल्या होत्या.

https://twitter.com/BrokenCricket/status/1706471896492191842

विश्वचषक स्पर्धेत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
578 – केन विलियम्सन (2019)
548- माहेला जयवर्धने (2007)
539 – रिकी पाँटिंग (2007)
507 – ऍरॉन फिंच (2019)
482 – एबी डिविलियर्स (2015)
465 – सौरव गांगुली (2003)
465 – कुमार संगकारा (2011)
456 – मार्टिन क्रो (1992)
443 – ग्रीम स्मिथ (2007)
443 – विराट कोहली (2019)
415 – रिकी पाँटिंग (2003) (Most Runs as a Captain in a World Cup Tournament only two indians in the list)

विश्वचषक विशेष-
बॅटिंग ते बॉलिंग, बेन स्टोक्सने 2019च्या वर्ल्डकपमध्ये केलेला कहर; World Cup 2023मध्ये वाढणार इंग्लंडची ताकद
किस्से वर्ल्डकपचे: आणि मलिंगाचे ‘ते’ चार चेंडू इतिहासात अजरामर झाले
किस्से वर्ल्डकपचे: गप्टिलचा थ्रो स्टम्पसवर नव्हेतर भारतीयांच्या हृदयावर लागलेला
विश्वचषक कमी, पण शतके जास्त! रोहितचा World Cupमधील भन्नाट Record, 2023मध्ये भीमपराक्रम करण्याची संधी
वर्ल्डकप 2019 मध्ये घडलेले सर्व विक्रम, रोहित-वॉर्नरकडे यावर्षी मोठी संधी
किस्से वर्ल्डकपचे: वर्ल्डकप म्हटलं की 2003 ची फायनल आणि पॉंटिंग डोक्यातून जात नाही
किस्से वर्ल्डकपचे: त्यादिवशी चिन्नास्वामीवर केविन ओब्रायनने इंग्लडला गुडघ्यावर आणलेलं
World Cup 2023 Preview: 10 संघांपासून ते सामन्यांच्या ठिकाणांपर्यंत, सर्व माहिती एकाच क्लिकवर
कशी आहे विराटची World Cupमधील कामगिरी? 2 वर्ल्डकपमध्ये ठोकलंय शतक, वाचा लेखाजोखा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---