भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात ९७ तर दुसऱ्या डावात नाबाद ९३ धावांची खेळी केली आहे.
याच मालिकेत विराटने एक खास विक्रही केला आहे. इंग्लंडमध्ये एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तो भारतीय कर्णधार बनला आहे.
याबरोबर विराटने कर्णधार म्हणुन कोणत्याही भारतीय खेळाडूला जमला नाही असा पराक्रम केला आहे.
भारतीय कर्णधार या नात्याने त्याने एका मालिकेत आॅस्ट्रेलियात २०१४-१५ला ४४९, दक्षिण आफ्रिकेत २०१८ला २८६ तर इंग्लंडमध्ये सध्या सुरु असलेल्या मालिकेत ४३० धावा केल्या आहेत.
भारतीय कर्णधाराने या तीन देशांत केलेल्या या सर्वोच्च धावा आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–एशियन गेम्स कबड्डीत भारतीय पुरुष कबड्डी संघाचा निराशाजनक पराभव
–एशियन गेम्स: लक्ष्यने मिळवून दिले भारताला दुसरे रौप्यपदक
–एशियन गेम्स: नेमबाज दिपक कुमारला रौप्यपदक