---Advertisement---

भारताकडून टी20 विश्वचषकात विराटच करतोय सर्वाधिक धावा; गंभीर, रैना अन् रोहितही मागेच

On: गुरूवार, नोव्हेंबर 3, 2022 7:21 PM
Virat-Kohli
---Advertisement---

भारतीय संघ टी20 विश्वचषक 2022मध्ये तुफान फॉर्मात आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. यातील 3 सामन्यात भारताला विजय मिळवण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे, यादरम्यान भारतीय विस्फोटक फलंदाज विराट कोहली याची बॅट चांगलीच तळपलीये. विराटने बांगलादेशविरुद्ध खेळताना शानदार अर्धशतक झळकावले. यामुळे त्याच्या नावावर खास विक्रमाचीही नोंद झाली. चला तर विराटने काय कारनामा केलाय पाहूया…

बुधवारी (दि. 02 नोव्हेंबर) ऍडलेड येथे भारताचा विश्वचषकातील चौथा सामना बांगलादेशविरुद्ध झाला. या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 184 धावा चोपल्या होत्या. यावेळी भारताकडून विराट कोहली (Virat Kohli) याने शानदार फटकेबाजी करत 44 चेंडूत नाबाद 64 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 8 चौकारही मारले. यासह तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वलस्थानी पोहोचला.

विराटने आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यात 220च्या सरासरीने 220 धावा चोपल्या आहेत. यादरम्यान तो 3 वेळा नाबाद राहिला होता. यामुळे तो टी20 विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पुन्हा एकदा सामील झाला.

या यादीत सर्वात अव्वलस्थानी विराटच आहे. त्याने 2014 सालच्या टी20 विश्वचषकात 319 धावा चोपल्या होत्या. यानंतर 2016 सालच्या विश्वचषकातही सर्वाधिक धावा चोपणाऱ्या फलंदाजांमध्ये विराटचाच क्रमांक होता. त्याने 273 धावा केल्या होत्या. 2007च्या टी20 विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज गौतम गंभीर होता. त्याने 227 धावा केल्या होत्या. यानंतर 2022मध्ये विराट कोहली 220 धावा केल्यामुळे या यादीत चौथ्या स्थानी आहे. पाचव्या स्थानी सुरेश रैना असून त्याने 2010 सालच्या टी20 विश्वचषकात 219 धावा केल्या होत्या. तसेच, या यादीत सहाव्या स्थानी असणाऱ्या रोहित शर्मा याने 2014 सालच्या टी20 विश्वचषकात 200 धावा करण्याची कामगिरी केली होती.

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेश अपयशी
हे आव्हान पार करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेशला पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार 151 धावांचे आव्हान मिळाले. मात्र, हे आव्हानही त्यांना पार करता आले नाही. त्यांनी यावेळी 6 विकेट्स गमावत फक्त 145 धावाच केल्या. त्यामुळे हा सामना भारताने 5 विकेट्सने आपल्या नावावर केला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: संजू सॅमसनने केला टेनिस बॉलचा सराव, एकापेक्षा एक शॉट मारताना दिसला पठ्ठ्या
भारतापाठोपाठ धवनच्या खांद्यावर आयपीएलच्या ‘या’ संघाची जबाबदारी, तुम्हीही म्हणाल, ‘गब्बर छा गये तुम’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---