अनेक क्रिकेटपटूंसाठी 2023 हे वर्ष शानदार ठरले आहे. या खेळाडूंमध्ये न्यूझीलंडच्या एका स्टार खेळाडूचाही समावेश आहे. तो खेळाडू इतर कुणी नसून विस्फोटक फलंदाज विल यंग आहे. विल सध्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत न्यूझीलंड संघाचा भाग आहे. त्याने बुधवारी (दि. 18 ऑक्टोबर) चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडिअममध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळताना जबरदस्त कारनामा केला.
विल यंगचा विक्रम
या सामन्यात अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच, न्यूझीलंड संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. यावेळी न्यूझीलंडकडून डावाची सुरुवात करण्यासाठी डेवॉन कॉनवे (Devon Conway) आणि विल यंग (Will Young) मैदानात उतरले होते. यावेळी विलने जबरदस्त फटकेबाजी करत 57 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने या सामन्यात 64 चेंडूत एकूण 54 धावा केल्या. या खेळीत 3 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. या खेळीसह त्याने आपल्या नावावर खास विक्रम केला.
न्यूझीलंडसाठी 2023 या वर्षात वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विल यंग (Will Young) दुसऱ्या स्थानी विराजमान झाला. तो न्यूझीलंडसाठी यावर्षी वनडेत 700 धावांचा टप्पा पार करणारा दुसरा फलंदाज ठरला. त्याने 17 सामन्यात 43.87च्या सरासरीने 702 धावा केल्या. यामध्ये 7 अर्धशतकांचा समावेश आहे.
न्यूझीलंडसाठी 2023मध्ये वनडेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज डॅरिल मिचेल आहे. त्याने 789 धावा केल्या आहेत. तसेच, तिसऱ्या स्थानी डेवॉन कॉनवे असून त्याने 698 धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त चौथ्या स्थानी टॉम लॅथम असून त्याने 468 आणि पाचव्या स्थानी असलेल्या रचिन रवींद्र याने 404 धावा केल्या आहेत.
न्यूझीलंडसाठी 2023मध्ये वनडेत सर्वाधिक धावा करणारे फलंदा
789 – डॅरिल मिचेल
702 – विल यंग*
698 – डेवॉन कॉनवे
468 – टॉम लॅथम
394 – रचिन रवींद्र
खराब सुरुवात
न्यूझीलंड संघाची या सामन्यात खराब सुरुवात झाली. त्यांनी 22व्या षटकापर्यंत 113 धावांवर 4 विकेट्स गमावल्या आहेत. यादरम्यान संघाकडून फक्त विल यंग (54) यानेच अर्धशतक केले आहे. तसेच, अफगाणिस्तानकडून अझमतुल्लाह उमरजाई याने सर्वाधिक 2 विकेट्स, तर मुजीब उर रहमान आणि राशिद खान यांनी प्रत्येकी 1 घेतली आहे. (Most runs for New Zealand in ODIs in 2023)
हेही वाचा-
शाब्बास रे पठ्ठ्या! ICC ODI Rankingमध्ये रोहितचा धमाका, ‘या’ क्रमांकावर झेप घेत सर्वांनाच केले हैराण
‘हा विजय विश्वचषक जिंकण्यापेक्षा…’, नेदरलँड्सच्या जबरदस्त विजयाबद्दल पाकिस्तानी खेळाडूचे मोठे भाष्य